शेअर बाजारात तेजी! Sensex ने पुन्हा एकदा गाठला 60 हजारांचा टप्पा!

137

तब्बल चार महिन्यांनी शेअर बाजारात तेजी दिसून आली असून सेन्सेक्सने पुन्हा एकदा 60 हजारांचा टप्पा गाठला आहे. शेअर बाजाराच्या व्यवहाराला बुधवारी सुरुवात झाल्यानंतर सेन्सेक्स निर्देशांक 95.84 अंकांनी वधारत 59,938.05 अंकांवर खुला झाला. एनएसईचा निफ्टी निर्देशांक 42 अंकांनी वधारत 17,868 अंकांवर खुला झाला.

या कंपन्यांच्या शेअर दरात तेजी 

बाजाराला सुरुवात होताच सकाळी 9.29 वाजता सेन्सेक्स 161 अंकांनी वधारत 60,008.11 अंकांवर पोहचला होता. त्यानंतर पुन्हा खाली घसरला. सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 185 अंकांनी वधारत 60,027.58 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 63 अंकांनी वधारत 17,888.35 अंकांवर व्यवहार करत आहेत. मुंबई शेअर बाजारातील एनटीपीसी, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, हिंदुस्थान युनिलिव्हर, एशियन पेंट्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, एल ऍण्ड टी, अल्ट्राटेक सिमेंट, टायटन, आयटीसी, टेक महिंद्रा, नेस्ले, ऍक्सिस बँक, इंडसइंड बँक, विप्रो, पॉवरग्रीड, सन फार्मा सारख्या कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. एसजीएक्स निफ्टी प्री-ओपनिंगमध्ये 17904 अंकांच्या पातळीवर गेला होता. निफ्टी निर्देशांक 10 अंकांनी वधारत 17833.55 अंकांवर व्यवहार करत होता. तर, बीएसईचा सेन्सेक्स निर्देशांक 11 अंकांनी वधारत 59853.6 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता.

(हेही वाचा – ‘… अब तांडव होगा!’ मोहीत कंबोज यांच्या नव्या Tweet ने चर्चांना उधाण)

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये मंगळवारी शेअर बाजार बंद होताना 400 अंकांची वाढ झाली होती. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या निफ्टीमध्ये 133 अंकांची वाढ नोंदवण्यात आली. सेन्सेक्समध्ये 0.67 टक्क्यांची वाढ होऊन 59,863 तो अंकावर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 0.76 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,831 अंकावर पोहोचला होता. निफ्टी बँकच्या इंडेक्समध्येही आज 207 अंकांची वाढ होऊन तो 39,249 अंकांवर पोहोचला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.