और भाई क्या चल रहा है, फॉग चल रहा है, ही जाहिरात खूप गाजली. आज जर कुणाला विचारलं की आज देशात कशाची हवा आहे, तर कुणीही म्हणेल सध्या तरी देशात योगी आदित्यनाथ यांच्या बुल्डोझरची हवा आहे. दंगली करणार्यांवर जरब बसवण्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी बुल्डोझरचा वापर केला आणि युपीमध्ये दंगली कमी झाल्या.
दंगलखोरांच्या घरावर बुल्डोझर चालवल्यामुळे दशहत पसरवणार्यांच्या मनात भिती निर्माण झाली. त्याआधीही बुल्डोझर खूप प्रसिद्ध होताच. कुठेही बुल्डोझरचं काम असलं तरी लोक बघायला जमा व्हायचे. बुल्डोझरला भारतात जेसीबी म्हणतात. पण तुम्हाला माहिती आहे का की, बुल्डोझरची निर्मिती कधी झाली होती? आम्ही तुम्हाला आपल्या लाडक्या जेसीबीच्या जन्माची कथा सांगणार आहोत.
( हेही वाचा : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहते भाड्याच्या घरात )
शोध बुल्डोझरचा
बुल्डोझरचा शोध जेम्स कमिंग्ज आणि जे. अर्ल मॅकलिओड यांनी १९२३ रोजी लावला होता. त्यावेळेस त्या दोघांनाही माहित नव्हतं की पुढे जाऊन हा बुल्डोझर खूप कामी येणार आहे आणि भारतात तर योगी आदित्यनाथ याचा वेगळ्याच कारणासाठी वापर करणार आहेत.
काही लोक असं म्हणतात की बुलडोझरचा शोध बेंजामिन होल्टने १९०४ मध्ये लावला होता. त्याच सुमारास, इंग्लंडच्या हॉर्नस्बी कंपनीनेही आजच्या बुलडोझरसारखीच असलेल्या बुलडोझरच्या आवृत्तीचे पेटंट घेतले होते.
हॉर्नस्बी कंपनीने १९१४ च्या सुमारास आपले पेटंट बेंजामिन होल्टला विकले. लोक या प्रकाराला बुल्डोझर म्हणत असले तरी तो क्रॉलरचा एक प्रकार होता.
बुल्डोझरचा वापर कशासाठी व्हायचा?
ज्या लोकांनी बुल्डोझरचा शोध लावला त्यांनाही माहीत नव्हतं की पुढे त्याचा उपयोग इमारत पाडणे, रस्तेबांधणी यांसारख्या महत्त्वाच्या कामांसाठी होईल. सुरुवातीच्या काळात शेतीसाठी बुल्डोझरचा वापर केला जात होता. आश्चर्यचकीत झालात ना? पण हे खरंय.
१९४० पूर्वी बुल्डोझरचा वापर फक्त ट्रॅक्टरसोबत शेतकामांसाठी केला जात होता. याच्या मदतीने कमी वेळात अधिकाधिक शेतजमीन तयार व्हायची. कालांतराने त्याची उपयुक्तता वाढू लागली. त्यानंतर बुल्डोझरचा वापर बांधकामासाठी होऊ लागला. बुल्डोझरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे इंजिन खूप शक्तिशाली असते.
कॅटरपिलर ट्रॅक्टर कंपनीने मोठ्या प्रमाणात बुल्डोझर निर्माण केले. १९५० दरम्यानचे युग हे अमेरिकेसाठी अत्यंत महत्वाचे ठरले. याच काळात मोठ्या प्रमाणात विकास होत गेला आणि या विकासात बुल्डोझरने साथ दिली. त्यानंतर बुल्डोझरचे स्वरुपही बदलले. त्याचं स्वतःचं असं अस्तित्व निर्माण झालं.
पिवळा रंग कसा आला?
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की बुल्डोझरचा वापर पहिल्या महायुद्धात करण्यात आला होता. ब्रिटन आणि अमेरिकेने याचा पुरेपूर वापर केला होता. रस्ते व सप्लाय लाईन मोकळी करण्यासाठी बुल्डोझर कामी आला.
तर पूर्वी बुल्डोझर सफेद किंवा लाल रंगाचा असायचा. जेव्हा याची मागणी वाढली तेव्हा रंग बदलण्यात आला. आज बुल्डोझर म्हटलं की जेसीबी आठवते. तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की जेसीबी हे कंपनीचं नाव आहे. लोक जेसीबीला बुल्डोझर समजतात. जेसीबी ही एक ब्रिटिश मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. १९४५ मध्ये या कंपनीची स्थापना झाली होती. त्यांच्या मशीनचं नाव आहे Backhoe Loader.
तर वाचकांनो, ज्या वेळेस बुल्डोझरची मागणी वाढली त्यावेळेस झालं असं की रात्री कंस्ट्रक्शन साईटवर जेसीबी मशीन लांबून दिसायची नाही. लाल रंगाचा बुल्डिझर दूर्बीण लावूनही दिसत नव्हता, लोकांना खूप अडचण व्हायची. पिवळ्या रंगाची वस्तू लांबूनही उठून दिसते. या महत्वाच्या कारणासाठी जेसीबी मशीनचा म्हणजे आपल्या बुल्डोझरचा रंग पिवळा करण्यात आला.
आता पिवळा रंग लांबून जरी दिसला तरी लोकांना कळतं की खोदकाम सुरु आहे. मग ते त्या वाटेने जायचं टाळतात. आज पिवळा रंग ही जेसीबीची ओळख झालेली आहे.
तर आता आपण जी जेसीबी मशीन पाहतो त्या मशीनच्या जन्माची ही कहाणी होती. आजही लोक बुल्डोझरचं खोदकाम पाहायला उभे राहतात. योगीजींनी तर बुल्डोझरला एक वेगळीच ओळख मिळवून दिली. आता उत्तराखंड आणि मध्यप्रदेशही त्याच वाटेवर आहे. पण आम्ही तुम्हाला सांगितलं की बुल्डोझरचा जन्म कंस्ट्रक्शन, खोदकाम किंवा घर पाडण्यासाठी झाला नव्हता, तर शेती करण्यासाठी झाला होता.