राफेलच्या चौकशीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

130

राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणाची न्यायालयाच्या देखरेखीत स्वतंत्र चौकशी करण्यात यावी अशी नवी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. याचिकाकर्ते एम.एल. शर्मा यांनी दाखल केलेली ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

(हेही वाचा – Monsoon Session 2022: मंत्रालयासमोर पेटवून घेतलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू)

याचिकेनुसार फ्रेंच पोर्टलमध्ये दावा करण्यात आला होता की, राफेल खरेदी व्यवहारात डसॉल्ट एव्हिएशनने एका भारतीय एजंटला 10 लाख युरो दिले होते. जर ते फ्रान्स सरकारने मंजूर केलेले दस्तऐवज असेल तर, करार रद्द करण्यासाठी कायद्याचे नियम लागू केले जाऊ शकतात.

देशात राफेल या लढाऊ विमानाच्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचे फ्रेंच पोर्टलच्या दाव्यानुसार सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. वकील एम.एल. शर्मा यांनी फ्रेंच पोर्टलच्या दाव्यावर याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयाकडून स्वतंत्र तपासाची मागणी केली होती. हा करार रद्द करून दंडासह संपूर्ण रक्कम वसूल करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती. यासोबत या प्रकरणाची चौकशी न्यायालयाच्या देखरेखेत स्वतंत्र तपास करण्यासाठी आदेशाची मागणी केली होते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी सुनावणीस नकार देत ही याचिका फेटाळून लावली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.