नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपातून प्राध्यापक जी.एन.साईबाबा यांची सुटका करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने साईबाबा यांना निर्दोष ठरवले होते. त्याला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिल्याने राज्य सरकारला दिलासा मिळाला आहे.
( हेही वाचा: दिवाळीतही जांबोरी मैदान भाजपकडे: येत्या १९ ते २३ ऑक्टोबर मराठमोळ्या दीपोत्सवाचे आयोजन )
उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती
नागपूर खंडीपीठाने प्राध्यापक साईबाबा यांची निर्दोष मुक्तता करण्याच्या निर्णयाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर शनिवारी सुनावणी झाली. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलासा देत, प्राध्यापक जी.एन. साईबाबा यांची सुटका करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.
Join Our WhatsApp Community