ज्ञानवापी मशिदिमधील पहिल्या दिवसाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. ही कार्यवाही कडेकोट बंदोबस्तात शनिवारी 14 मे रोजी पार पडली. रविवारी पुन्हा सर्वेक्षण केले जाणार आहे. तसेच, सुरक्षेच्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने ज्ञानवापी मशीद संकुलापासून एक किलोमीटर अंतरावरील वाहतुकीवर बंदी घालण्यात आली होती.
सर्वेक्षणासाठी वकील आयुक्त अजय मिश्रा आणि फिर्यादी- प्रतिवादी बाजूचे सुमारे 52 लोक ज्ञानवापी मशिदीच्या आवारात गेले होते. यावेळी पाहणी पथकातील सर्वांचे मोबाईल बाहेर जमा करण्यात आले होते. तसेच, या पथकाकडून तळघरांची व्हिडीओग्राफीही करण्यात आली आहे.
सर्वेक्षणासाठी विशेष कॅमेरे आणि लाईटची व्यवस्था
श्री काशी विश्वनाथ मंदिर परिसरात येणा-या भाविकांची कसून तपासणी करुनच प्रवेश दिला जात होता. आजूबाजूची दुकानेही बंद ठेवण्यात आली होती. सर्वेक्षणासाठी विशेष कॅमेरे आणि लाईटची व्यवस्था करण्यात आली होती. पाच खोल्यांची व्हिडिओग्राफी करण्यात आली. राज्याचे डीजीपी आणि मुख्य सचिव सर्वेक्षणावर लक्ष ठेवत असून साधारण दुपारी 12 वाजेपर्यंत काम केले गेले.
( हेही वाचा: मुंबई महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर )
17 मे ला अहवाल सादर करणार
17 मे रोजी न्यायालयात अहवाल सादर करायचा असल्याने, सोमवारीही सर्वेक्षण सुरु राहणार आहे. तसेच, गरज भासल्यास 17 तारखेलाही सर्वेक्षण पूर्ण करुन न्यायालयाची परवानगी घेऊन अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community