-
ऋजुता लुकतुके
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एक उंच पुतळा अमेरिकन राजधानी जवळ मेरिलँड राज्यात विराजमान झाला आहे. (Ambedkar Statue in USA)
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १९ फूट उंच पुतळा अमेरिकेत मेरिलँड राज्यात विराजमान झाला आहे. रविवारी या पुतळ्याचं अधिकृतपणे उद्घाटन करण्यात आलं तेव्हा ५०० च्या वर अमेरिकन-भारतीय तसंच खास भारतातून या कार्यक्रमासाठी गेलेले आंबेडकरांचे अनुयायी तिथं हजर होते. त्यांनी ‘जय भीमचा’ जयघोष करून या ‘स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी’ला मानवंदना दिली. (Ambedkar Statue in USA)
भारताबाहेरचा हा डॉ. आंबेडकारांचा सगळ्यात उंच पुतळा आहे. प्रसिद्ध कलाकार आणि शिल्पकार राम सुतार यांनी हा पुतळा बनवला आहे. सुतार यांनीच भारतात नर्मदेच्या किनाऱ्यावर वसलेला स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार पटेलांचा पुतळाही बनवला आहे. ‘आम्ही या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी हे नाव दिलं आहे. कारण, एकता किंवा समानता हा फक्त भारतापुरता मर्यादित प्रश्न नाही. तो वेगवेगळ्या स्वरुपात जगभरात अस्तित्वात आहे,’ असं सुतार उद्घाटनानंतर पीटीआयशी बोलताना म्हणाले. (Ambedkar Statue in USA)
(हेही वाचा – Mumbai Crime Branch : ४८ तासांत पोलिसांनी दिला ४२ तडीपार गुन्हेगारांना दणका)
राम सुतार हे आंबेडकर इंटरनॅशनल केंद्राचे अध्यक्षही आहेत. त्यांच्याच संकल्पनेतून हा पुतळा अमेरिकेत बसवण्यात आला आहे. आंबेडकरांचा अमेरिकेतील हा पुतळा ॲक्सोकिक या रहिवासी वसाहतीत वसलेला आहे आणि हे ठिकाण अमेरिकन राजकारणाचं सत्ताकेंद्र व्हाईटहाऊस पासून फक्त २२ मैल अंतरावर आहे. (Ambedkar Statue in USA)
पुतळ्याच्या ठिकाणी १३ एकर जागेवर आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राने हे स्मारक विकसित केलं आहे. इथं आंबेडकरी विचारांवर आधारित पुस्तकांचं एक सुसज्ज ग्रंथालय आहे. तसंच एक कन्व्हेंशन सेंटरही आहे. शिवाय बुद्ध गार्डन नावाने मोकळी जागाही विकसित करण्यात आली आहे. (Ambedkar Statue in USA)
दलित इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष रवीकुमार नरा या कार्यक्रमासाठी भारतातून अमेरिकेत गेले होते. त्यांनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘देशाच्या स्वातंत्याला ७५ वर्षं झाली असताना आंबेडकरी विचार आता जगभर पोहोचले आहेत. आणि तिथेही त्यांच्या विचारांना लोकांचा पाठिंबा मिळतोय,’ असं नरा यावेळी म्हणाले. अमेरिकेतील दलित बांधवांनी एकत्र येऊन या पुतळा आणि स्मारक उभारणीसाठी पैसे गोळा केले आहेत. (Ambedkar Statue in USA)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community