भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील (राणीबाग) पेंग्वीन कक्षातील आणि त्यातील पेंग्वीन पक्ष्यांची देखभाल करण्यासाठी नेमण्यात येणाऱ्या कंत्राट कामांच्या निविदा चर्चेत असताना पुन्हा या कामांसाठी हाय वे कंस्ट्रक्शन कंपनीच लाभार्थी ठरली आहे. महापालिकेने पुढील ३६ महिन्यांसाठी मागवलेल्या निविदेमध्ये पुन्हा एकदा एकमेव हाय वे कंपनीच पात्र ठरली असून, या कंपनीला या कालावधीसाठी १५ कोटी ८७ लाख रुपये मोजले जाणार आहेत.
नव्याने निविदा मागवण्यात आल्या
राणीबागेत १८ मार्च २०१७ रोजी हंबोल्ट पेंग्वीन कक्ष सुरु करण्यात आल्यानंतर हे पक्षी व कक्षाच्या व्यवस्थापनासाठी प्रशिक्षित कर्मचारी नसल्याने महापालिकेने तीन वर्षांसाठी कंत्राटदाराची नेमणूक केली होती. पिंजऱ्याचे बांधकाम व पक्षी आणण्याचे कंत्राट हाय वे कस्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते, त्यामुळे याचे व्यवस्थापन राखण्यासाठीही तीन वर्षांकरता त्यांची नेमणूक केली होती. या तीन वर्षांकरता कंपनीला ११ कोटी रुपयांचा खर्च आला होता. परंतु हा कालावधी संपुष्टात आल्याने पुढील तीन वर्षांकरता नव्याने निविदा मागवण्यात आल्या होत्या.या नव्याने मागवलेल्या निविदांमध्य पहिल्या दोन वेळेला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने तिसऱ्यांदा निविदा मागवण्यात आली. या निविदेमध्ये एकच निविदा प्राप्त झाल्याने या एकमेव हाय वे कंस्ट्रक्शन कंपनीची निवड करण्यात आली आहे.
हाय वे लाच देण्यात आल्या निविदा
या कंपनीने तीन वर्षांकरता १५ कोटी २६ लाख रुपयांचा दर निश्चित केला आहे. त्यामुळे विविध करांसह हा खर्च १५ कोटी ८७ लाख २८ हजार रुपयांचा आहे. सन २०१७ पासून या पिंजऱ्यांचे व तेथील हम्बोल्ट पक्ष्यांच्या देखभालीचे काम हे हाय वे कंस्ट्क्शन कंपनीच्या माध्यमातूनच केले जात आहे. मागील निविदेचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर तसेच नवीन निविदेची प्रक्रिया पार पडण्यापूर्वी सहा आठवड्यांचा कालावधी वाढवून देण्यात आले आहे. यामध्ये याच कंपनीला ४५ लाख रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे.
(हेही वाचा : कोविडने पतीचा मृत्यू! महापालिका करणार गरजू, गरीब महिलांना मदत )
Join Our WhatsApp Community