महाराष्ट्र उपाशी, तर शेजारील राज्य तुपाशी! पर्यटकांची अन्य राज्यांकडे धाव

कोरोना महामारीच्या संकटामुळे २०२० पासून राज्यातील हॉटेल, टॅक्सी, पर्यटन व्यवसाय ठप्प झाले आहेत. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने पुन्हा कोरोना वाढल्याच्या नावाखाली पर्यटन व्यवसायाची मुस्कटदाबी केली आहे. महाराष्ट्र राज्याने नव्या आदेश जारी करत पुन्हा एकदा राज्यातील पर्यटन स्थळे बंद केली आहेत. यामुळे कर्जाचा डोंगर डोक्यावर घेऊन जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या छोट्या मोठ्या टॅक्सी, हॉटेल, ट्रॅव्हल एजंट त्यांचे कर्मचाऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. खरेतर महाराष्ट्रात फक्त मुंबई, ठाणे पुणे ह्याच भागात बहुसंख्य सौम्य लक्षणे असणारे कोरोना रुग्ण आढळत आहेत.

( हेही वाचा : महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे बंद! मात्र प्रवाशांची रेल्वेकडून लूट )

पर्यटकांची अन्य राज्यांकडे धाव

अशा वेळी पर्यटन स्थळे मर्यादित व सुरक्षित वेळेत सुरू ठेवली असती तरी त्याचा मोठ्या प्रमाणात स्थानिकांना फायदा झाला आहे. मात्र या निर्बंधांमुळे महाराष्ट्रात येणारा पर्यटक वर्ग, देशातील अन्य राज्यांकडे वळला आहे. विशेष म्हणजे राज्यातील बस सेवांना पूर्ण क्षमतेने प्रवासी नेण्याची परवानगी आहे, त्याचवेळी राज्यातील जंगल सफारी ज्यात फक्त सहा पर्यटक एका जीपमध्ये असतात, त्या सफारीवर सुद्धा महाराष्ट्र शासनाने बंदी घातली आहे. मात्र महाराष्ट्रालगत असलेल्या शेजारील राज्यात सफारी सुरू आहे. त्यामुळे सध्याच्या जंगल सफरीच्या महत्वाच्या सिझनमध्ये महाराष्ट्रातील केंद्रे उपाशी व अन्य राज्यातील सफारी केंद्रे पूर्ण गर्दीने तुपाशी अशी परिस्थिती आहे.

छोट्या संस्थांचा व्यवसाय धोक्यात

महाराष्ट्र पर्यटन क्षेत्रात एकी नसल्याने मोजके मोठे व्यावसायिक सोडून अन्य छोट्या संस्थांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. निदान पर्यटक संख्येचे बंधन, ई-पास (Epass) इत्यादी मार्गाने सुरक्षितता वाढवणे शक्य आहे. पण महाराष्ट्र सरकार यावर निर्णय केव्हा घेणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याउलट अंदमान सारख्या ठिकाणी मात्र तेथील प्रशासनाच्या पर्यटन बंद करण्याच्या निर्णयाविरुद्ध मोठे आंदोलन तेथील टॅक्सी, हॉटेल, ट्रॅव्हल एजंट यांनी सुरू केले आहे. कारण एप्रिल पर्यंतच येथील व्यवसाय असतो.

(हेही वाचा लोहगडाचा होतोय श्रीमलंग गड! राज्यात जमावबंदी, संचारबंदी तरी उरुसाची घाई!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here