अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडी या केंद्रीय तपास यंत्रणेचे सह संचालक सत्यव्रत कुमार यांची बदली करण्यात आली आहे. सत्यव्रत कुमार हे मुंबई कार्यालयातील सह संचालक म्हणून प्रतिनियुक्तीवर होते. महाराष्ट्रातील राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील प्रकरणाचा तपास मुंबई कार्यालयातून सुरू असून त्यात सत्यव्रत कुमार यांच्या बदलीमुळे उलटसुलट चर्चा होऊ लागल्या आहेत.
सत्यव्रत कुमार यांना नवीन नियुक्ती नाही!
सत्यव्रत कुमार हे महाराष्ट्रात प्रतिनियुक्तीवर आले होते, त्यांचा प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ संपला होता, प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ वाढवून देण्याचा प्रस्ताव वित्त विभागाने कार्मिक विभागाकडे पाठवला होता, तत्पूर्वी केंद्रीय दक्षता कमिटीची यासाठी मान्यता घ्यावी लागते. मात्र केंद्रीय दक्षता कमिटीने हा प्रस्ताव अमान्य केला आहे. हा प्रस्ताव अमान्य झाल्यामुळे सत्यव्रत यांना कार्यकाळ वाढवून देण्यात येणार नसल्यामुळे त्यांना परत आपल्या पूर्वीच्या ठिकाणी म्हणजे कस्टम आणि केंद्रीय अबकारी विभागात परतावे लागणार आहे. सत्यव्रत कुमार यांच्या जागी अद्याप नवीन नियुक्ती देण्यात आलेली नसून त्यांच्या जागेवर कोण येते, याकडे ईडीच्या मुंबई कार्यालयाचे डोळे लागून राहिले आहे.
(हेही वाचा : कांदेंना आली धमकी, भुजबळांनी काय केले? वाचा)
महत्वाचे प्रकरण हाताळत होते सत्यव्रत कुमार!
नीरव मोदी, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, मंत्री अनिल परब या सारख्या दिग्गजाचा तपास सत्यव्रत पहात होते. हे सर्व तपास त्यांच्याकडून काढून घेण्यात आले असून त्यांच्याकडे कुठल्याही प्रकरणाचा तपास देऊ नये, असे आदेशात म्हटले आहे . सत्यव्रत यांच्याकडे आता केवळ कोल ब्लॉक प्रकरणाचा तपास असणार आहे. मागील सात वर्षापासून सत्यव्रत कुमार अंमलबजावणी संचालनालय (ईडी) मध्ये कार्यरत होते.
Join Our WhatsApp Community