अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (Federal Bureau of Investigation) राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Us President Joe Biden) यांच्या विल्मिंग्टन येथील निवास्थानी 13 तास झडती घेतली. या ठिकाणाहून त्यांनी काही गोपनीय दस्ताऐवज जप्त केले आहेत.
एफबीआयने बायडेन यांच्या काही हस्तलिखित नोट्सही ताब्यात घेतल्या आहेत. अध्यक्षांचे वकील बाॅब बाउर यांनी ही माहिती दिली. बायडेन यांनी स्वेच्छेने एफबीआयला निवासस्थानी झडती घेण्याची परवानही दिली. मात्र, वाॅरंट नसतानाही घडलेलेली ही घटना असामान्य आहे.
एफबीआयची धाड बायडेनसाठी अडचणीची
बायडेन हे पुन्हा निवडणुकीसाठी आपला दावा करण्याच्या तयारीत असताना, एफबीआयने केलेली झडती बायडेन यांच्यासाठी अडचणीची ठरली आहे. साधारणत: गोपनीय दस्ताऐवज जास्तीत जास्त 25 वर्षांनी सार्वजनिक केले जातात. परंतु, काही नोंदी जास्त काळ गोपनीय ठेवल्या जातात. बायडेन यांनी 1973 ते 2009 या काळात सिनेटर म्हणून काम केले आहे.
( हेही वाचा: 23 जानेवारी: जगातील सर्वात विनाशकारी भूकंप; अवघ्या काही सेकंदात गेला लाखोंचा जीव )
महत्त्वाची कागदपत्रे FBI कडून जप्त
बायडेन यांच्या निवासस्थानात आणि खासगी कार्यालयांमध्ये सापडलेल्या एकूण गोपनीय कागदपत्रांची संख्या आता सुमारे दीड डझन झाली आहे. ही सर्व कागदपत्रे 2009 ते 2016 काळात त्यांच्या उपाध्यक्षपदाच्या कार्यकाळाशी संबंधित आहेत. ही कागदपक्षे आता फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या ताब्यात आहेत.
Join Our WhatsApp Community