मुंबईत तैनात असलेल्या २२ व्या क्षेपणास्त्रवाह नौकांच्या ताफ्याला म्हणजेच किलर स्क्वार्डनला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आंच्या हस्ते ‘प्रेसिडंट स्टँडर्ड’ हा विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. उद्या बुधवारी नौदल गोदीत हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
देशभरात स्वर्णिम विजय वर्ष
मुंबईत ऑक्टोबर १९९१ मध्ये २२ वे क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकांचे पथक स्थापन करण्यात आले. यामध्ये वीर वर्गाच्या दहा आणि प्रबळ वर्गाच्या तीन क्षेपणास्त्रवाहू नौका आहेत; त्यापूर्वीच्या किलर स्वार्डन पथकातील युद्धनौका रशियातून आणल्या होत्या. त्यांनी बांगलादेशमुक्ती युद्धात मोठी कामगिरी केली होती. हे वर्ष बांगलादेश मुक्तिसंग्रामाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून ते देशभर स्वर्णिम विजय वर्ष म्हणून साजरे केले जात आहे.
किलर स्वार्डनला अनेक पदकांनी सन्मानित
किलर स्वार्डन पथकाच्या स्थापनेचेही हे पन्नासावे वर्ष आहे. या पथकाने ऑपरेशन विजय, ऑपरेशन पराक्रम या मोहिमांमध्ये सहभाग घेतला होता. या ताफ्याला महावीरचक्र, सात वीरचक्र, तसेच आठ नौसेना शौर्य पदके देण्यात आली आहेत. या सोहळ्यानिमित्त पोस्ट खात्यातर्फे विशेष टपाल तिकीट आणि पाकीट प्रसिद्ध केले जाणार आहे. या सोहळ्यास राज्यपाल, मुख्यमंत्री, नौदलप्रमुख, सेनादलातील आणि नागरी सेवेतील अन्य मान्यवर अधिकारी हजर राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
(हेही वाचा – मुंबईतही ओमायक्रॉनचा शिरकाव: दोन रुग्णांना लागण)
देशसेवेसाठी सैन्यदलातील सर्वोच्च पुरस्कार
सैन्यदलांच्या पथकाकडून करण्यात आलेल्या देशसेवेसाठी राष्ट्रपतींच्या हस्ते ‘प्रेसिडंट स्टँडर्ड’ हा पुरस्कार दिला जात असून हा सर्वोच्च पुरस्कार आहे. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याहस्ते नौदलाला २७ मे १९५१ रोजी प्रेसिडेंट कलर्स हा पुरस्कार देण्यात आला होता. प्रेसिडेंट स्टँडर्ड हा मानाचा पुरस्कार असून तो सैन्यदलातील लहान विभागाला दिला जातो.
Join Our WhatsApp Community