भारतातील अनेक सरकारी वेबसाईट हॅक करण्यात आल्या आहेत. मेलशियामधील हॅक्टिविस्ट या ग्रुपच्या आवाहनानंतर या वेबसाईट हॅक करण्यात आल्या आहेत. या ग्रुपने जगभरातील मुस्लिम हॅकर्सना भारतावर सायबर अटॅक करण्याचे आवाहन केले आहे. त्यात ठाणे पोलीस, सायबर पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस दलाची मुख्य वेबसाईट चा समावेश आहे. या वेबसाईट हॅकरच्या ताब्यातून सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे
नुपूर शर्मा यांनी केलेलं वक्तव्य तसेच, मंदिर- मस्जिद वाद या पार्श्वभूमीवर मेलशियामधील हॅक्टिविस्ट ग्रुपकडून हे आवाहन करण्यात आले होते. मुस्लिम धर्मीयांची माफी मागा असाच संदेश या वेबसाईट हॅकच्या माध्यमातून देण्यात आला आहे. भारतातील महत्त्वाच्या सरकारी वेबसाईट हॅक केल्याने सरकारी माहिती चोरली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.