भयंकर! …म्हणून पत्नीनं मृत पतीला केलं जिवंत!

125

आयसीआयसीआय प्रुडेन्शीयल लाइफ इन्शुरन्स कंपनीची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कर्नाटकातील एका महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे. दायम्मा शरणप्पा बुधन्नगौडा (रा. चिलकामुक्की, ता. कोप्पल, रायचूर) या महिलेविरुद्ध सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. कंपनीचे मॅनेजर शैलेशकुमार रामराज मोर्या (रा. जुळे सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.

असा घडला प्रकार

१८ जानेवारी २०१४ पासून हा प्रकार घडला आहे. या लाइफ इन्शुरन्स कंपनीचे (हॉटेल कामतजवळ, जुना एम्प्लायमेंट चौक) ऑफिस आहे. दायम्मा यांचे पती शरणाप्पा हे १८ डिसेंबर २०११ रोजी मरण पावले. तरीदेखील ते जिवंत असल्याचे भासवून त्यांची पॉलिसी या कंपनीत काढण्यात आली. पहिला हप्ता सहा हजार ५२० रुपये भरला.

(हेही वाचा – कोरोनाची धास्ती कायम! मुंबईत ७ जानेवारीपर्यंत जमावबंदी)

पॉलिसी रक्कम हडपण्याचा केला प्रयत्न

वीस लाख रुपयांची खोटी विमा पॉलिसी उतरवली होती. यानंतर शरणाप्पा यांचा छातीतील दुखण्याने ७ मार्च २०१४ रोजी मृत्यू झाला, असे दाखवण्यात आले. बनावट मृत्युपत्र, कागदपत्रे तयार करून इन्शुरन्स रकमेची मागणी करून कंपनीची फसवणूक केली. पॉलिसी रक्कम हडपण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आल्यामुळे तक्रार देण्यात आली आहे. फौजदार गायकवाड तपास करत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.