मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता प्रभागांचे महिला आरक्षण जाहीर करण्यात आले असून त्यामध्ये महापालिकेच्या माजी समिती अध्यक्षांसह गटनेत्यांनाही महिलांनी धक्का दिला आहे. या प्रभाग आरक्षणामध्ये सध्या चर्चेत असलेले स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, माजी सुधार समिती अध्यक्ष सदा परब यांच्यासह माजी विरोधी पक्षनेते रवी राजा, गटनेते प्रभाकर शिंदे, विनोद मिश्रा, शिवसेनेचे युवा नगरसेवक अमेय घोले आणि समाधान सरवणकर यांना महिला आरक्षणाचा फटका बसला आहे.
( हेही वाचा : पुणे महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर)
नेत्यांना महिला आरक्षणाचा फटका
महापालिकेतील २३६ प्रभागांपैकी १०९ जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवून त्याअंतर्गत सोडत काढण्यात आली. यामध्ये पूर्वी जे प्रभाग महिला आरक्षित झाले नव्हते ते प्रभाग प्राधान्य क्रम १ व २ नुसार अनुक्रमे ५३ व ३३ अशाप्रकारे ८६ जागांवर महिला आरक्षण निश्चित केले, तर उर्वरीत २३ जागांवर चिठ्ठी पध्दतीने २३ जागांसाठी सोडत काढण्यात आली. यामध्ये महापालिकेतील दिग्गजांचे पत्ते कापले असून त्यांचे प्रभाग महिला आरक्षित झाल्याने त्यांना याचा जोरदार फटका बसणार आहे. यातील मनोज कोटक खासदार असल्याने तसेच रईस शेख हे आमदार असल्याने त्यांचे प्रभाग महिला झाल्याने याचा फटका बसणार नसला तरी स्थायी समिती राहिलेल्या यशवंत जाधव यांना मोठा झटका मानला जात आहे. तर प्रभाकर शिंदे यांचाही प्रभाग महिला आरक्षित झाल्याने त्यांना आता बाजूच्या प्रभागात जावे लागणार आहे
विरोधी पक्षनेते रवी राजा यांनाही महिला आरक्षणाचा फटका बसला असून त्यांनाही आता बाजूच्या प्रभागात जावे लागणार आहे. विशेष म्हणजे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विश्वासातील असलेल्या अमेय घोले आणि समाधान सरवणकर यांचे प्रभाग महिला आरक्षित झाल्याने त्यांनाही आता आजूबाजूचे प्रभागाचे दरवाजे बंद असल्याने जोरदार वशिला लावावा लागणार असल्याचे दिसते.
शिवसेना : माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर ,माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, माजी सुधार समिती अध्यक्ष सदा परब, माजी स्थापत्य उपनगरे समिती अध्यक्ष स्वप्नील टेंबवलकर, चंद्रशेख वायंगणकर, संजय घाडी, राजू पेडणेकर, विठ्ठल लोकरे, मंगेश सातमकर, उमेश माने, उपेंद्र सावंत, परमेश्वर कदम, श्रीकांत शेट्ये, मिलिंद वैद्य.
काँग्रेस : विरोधी पक्षनेते रवी राजा, आसिफ झकेरिया,विरेंद्र चौधरी, सुफियान वणू, राजेंद्र नरवणकर
भाजप : भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे, विनोद मिश्रा, मनोज कोटक, निल सोमय्या, हरिष भांद्रिर्गे, दिपक ठाकूर, हर्ष पटेल, संदीप पटेल, अभिजित सामंत, आकाश पुरोहित, मकरंद नार्वेकर,अतुल शाह, पंकज यादव, शिवकुमार झा, बाळा तावडे
समाजवादी पक्ष : आमदार रईस शेख, अख्तर कुरेशी
Join Our WhatsApp Community