‘महापौर’ या शब्दाची भेट स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्याला दिली – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘महानगर प्रशासनात महापौरांची भूमिका’ या विषयावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुजरातमधील राष्ट्रीय महापौर संमेलनात संबोधन केले.

अनेक विषयांवर देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महापौर या शब्दाची भेट स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्याला दिली. महापालिका प्रशासनात महापौर आणि नगरसेवक हे अतिशय महत्वाचे घटक असतात. नरेंद्र मोदी यांनी सुशासनाचा रचलेला पाया, नव्याने नगरविकासाच्या तयार झालेल्या योजना, शहरी विकास हे आव्हान नाही, तर त्याकडे संधी म्हणून बघण्याची गरज, विकासात शहराच्या विकास आराखड्याची भूमिका, संसाधनांचा सुयोग्य वापर, हरित ऊर्जा, राजकीय इच्छाशक्ती, नावीन्यपूर्ण प्रयोग, शहरवासीयांशी सातत्याने संवाद अशा अनेक विषयांवर देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला आणि विविध प्रश्नांना उत्तरे सुद्धा दिली.

( हेही वाचा : बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प : १५४ पात्र पोलीस गाळेधारकांच्या सदनिकांची निश्चिती)

देशभरातील सुमारे 18 राज्यातील 125 हून अधिक महापौर या संमेलनात सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने या राष्ट्रीय महापौर संमेलनाला प्रारंभ झाला, तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या संमेलनाचे उदघाटन केले. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी, गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील, डॉ. विनय सहस्रबुद्धे, विजयाताई रहाटकर आणि इतर नेते यावेळी उपस्थित होते. दोन दिवसांची ही परिषद असून त्यात विविध नेते आणि तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. केंद्र सरकारच्या महापालिकांसाठीच्या योजना, त्याची अंमलबजावणी, विविध महापालिकेतील यशस्वी योजनांचे सादरीकरण अशी अनेक सत्र या राष्ट्रीय महापौर संमेलनात होणार आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या भाषणाने या संमेलनाचा समारोप होईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here