जगातील सर्वात मोठे रिव्हर क्रूझ भारतात सुरु होणार आहे. या क्रूझला पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. भारतात लवकरच नदीतील सर्वात मोठ्या क्रूझचा प्रवास सुरु होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, हे क्रूझ नदीत चालणारे जगातील सर्वात मोठे क्रूझ असणार आहे. यात शाॅवरसह बाथरुम्स आहेत. कन्वर्टेबल बेड्स, फेंच बाल्कनी, एलईडी टीव्ही, तिजोरी, स्मोक अलार्म्स, लाईफ वेस्ट आणि स्प्रिंकलर्स यांचा समावेश आहे.
या क्रूझचा प्रवास 13 जानेवारी 2023 रोजी वाराणसीपासून सुरु होईल आणि 1 मार्च रोजी हे क्रूझ दिब्रुडला पोहोचण्याची शक्यता आहे. वाराणसीतील गंगा नदीवर प्रसिद्ध गंगा आरती करुन ही क्रूझ आपल्या प्रवासाला सुरुवात करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी 13 जानेवारी, 2023 वाराणसीमध्ये या क्रूझला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
( हेही वाचा: धारावीत लव्ह जिहाद! पत्नी गोमांस खात नाही म्हणून केली हत्या )
क्रूझमध्ये आहेत ‘या’ सुविधा
एमव्ही गंगा विलास हे नदीवरील क्रुझ शुक्रवारी वाराणसीहून आपल्या पहिल्या प्रवासाला मार्गस्थ होणार आहे. या क्रूझमध्ये आलिशान खोल्या आहेत. क्रूझवर एक आलिशान रेस्टाॅरंट, स्पा आणि सनडेकदेखील आहे. क्रूझच्या मुख्य डेकवर 40 जणांसाठी आसनव्यवस्था असलेले रेस्टाॅरंट आहे. या रेस्टाॅरंट्समध्ये काॅन्टिनेंटल आणि भारतीय पाककृतींसह काही बुफे काऊंटर आहेत. वरच्या डेकच्या आऊटडोअर सीटिंगमध्ये रिअल टीक स्टीमर खुर्च्या आणि काॅफी टेबलही आहेत.