Werner Von Siemens : जगातील पहिली लिफ्ट तयार करणारा अवलिया

242

आज आपण कुठेही गेलो तरी आपल्याला लिफ्ट उपलब्ध असते. जिने चढून जाण्याचा त्रास वाचतो. ज्या अवलियाने हा आविष्कार केला. आज आपण त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांचं नाव आहे, Werner Von Siemens.

Werner Von Siemens म्हणजेच अर्न्स्ट वर्नर सीमेन्स यांचा जन्म लेन्थे येथे १३ डिसेंबर १८१६ मध्ये झाला. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सीमेन्स यांनी Bauakademie बर्लिन येथे शिक्षण घेण्याचा विचार केला. मात्र त्यांच्या कुटुंबावर खूप कर्ज झाल्याने त्यांना शाळेची फी भरणे परवडले नाही. मग त्यांनी १८३५-१८३८ दरम्यान प्रशियन मिलिटरी अॅकॅडमीच्या स्कूल ऑफ आर्टिलरी अँड इंजिनीअरिंगमध्ये प्रवेश घेतला.

१ ऑक्टोबर १८४७ रोजी कंपनीची स्थापना 

ते एक चांगले सैनिक होते. त्यांना विविध पदके मिळाली. कीलच्या डॅनिश ब्लॉकेडचा सामना करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या एलेक्ट्रिकली-चार्ज्ड सी-माईन्सच्या शोधात त्यांनी योगदान दिले होते. युद्धभूमीवरुन घरी परतल्यावर, त्यांनी आधीच स्थापित केलेल्या तंत्रज्ञानावर काम करायला सुरुवात केली. त्यांनी केलेल्या विविध तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे ते जगप्रसिद्ध झाले. १८४३ मध्ये त्यांनी बर्मिंगहॅमच्या एल्किंग्टनला त्यांच्या पहिल्या शोधाचे हक्क विकले. सीमेन्स यांनी टेलिग्राफचा शोध लावला. या शोधाच्या आधारे त्यांनी १ ऑक्टोबर १८४७ रोजी Telegraphen-Bauanstalt von Siemens & Halske या कंपनीची स्थापना केली.

१८८० मध्ये त्यांनी जगातील पहिली इलेक्ट्रिक लिफ्ट तयार केली

सीमेन्स यांनी इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीच्या विकासात पुष्कळ योगदान दिले होते, ज्यामुळे ते जर्मनीतील फाउंडिंग फादर ऑफ द डिसिप्लीन म्हणून ओळख मिळाली. १८८० मध्ये त्यांनी जगातील पहिली इलेक्ट्रिक लिफ्ट तयार केली. या शोधामुळे त्यांनी जणू इतिहास रचला होता. आज जगभरात इलेक्ट्रिक लिफ्ट आहे. अगदी रेल्वे प्लॅटफॉर्मवर देखील लिफ्ट असते. यामुळे वृद्धांना आणि गुडघ्याचा त्रास असलेल्या व्यक्तींना आराम मिळतो. याचं श्रेय जातं ते सीमेन्स यांना.

(हेही वाचा Disha Salian : दिशा सालीयन मृत्यूचा तपास अप्पर पोलीस आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली होणार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.