जगातील सर्वात मोठ्या लिफ्टचे मुंबईत लोकार्पण!

99

कोने एलेविटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने जगातील सर्वात मोठी लिफ्ट भारतात तयार केली आहे. गुरुवारी या लिफ्टचे लोकार्पण करण्यात आले. कोने इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अमित गोस्सेन आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष राजमल नाहर यावेळी उपस्थित होते. जिओ वर्ल्ड सेंटर, बीकेसी, मुंबई येथे ही जगातील सर्वात मोठी प्रवासी लिफ्ट तयार करण्यात आली आहे.

हे एक मोठे आव्हान होते – अमित गोस्सेन

जगातील सर्वात मोठी प्रवासी लिफ्ट तयार करण्यासाठी एक वेगळी दृष्टी असावी लागते आणि आपल्या कल्पनेवर विश्वास ठेवणारी एक कार्यक्षम आणि उत्कट इच्छाशक्ती असणारी टीम असावी लागते, असे KONE India PVT. LTDचे व्यवस्थापकीय संचालक अमित गोस्सेन म्हणाले. जगातील सर्वात मोठी लिफ्ट भारतात बनवणे हे एक मोठे आव्हान होते. हा एक चौकटीबाहेरचा विचार होता, तसेच नवनवीन गोष्टी आणण्यासाठी सीमोल्लंघन आवश्यक आहे, असे मत अमित गोस्सेन यांनी व्यक्त केले. हा विचार समोर आल्यानंतर, अनेक महिने त्याचे नियोजन करावे लागले. यावर विचारमंथन झाले. जगातील सर्वात मोठी लिफ्ट तयार करण्यासाठी जगातील कुशल अभियांत्रिकींचे विचार घेण्यात आले. या जागतिक दर्जाच्या प्रकल्पासाठी योजना आखणे आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी अभियांत्रिकी संघाने अधिक परिश्रम घेतल्याचे अमित गोस्सेन म्हणाले.

elevator 2

जगातील सर्वात मोठी प्रवासी लिफ्ट भारतात 

ही लिफ्ट म्हणजे एक अभियांत्रिकी चमत्कार होता. लिफ्टच्या सुरक्षेसाठी 18 पुली आणि 9 दोऱ्यांचा आधार देण्यात आला आहे. संपूर्ण स्ट्रक्चरल शाफ्ट स्टीलच्या स्तंभांवर निश्चित केलेल्या रेलवर फिरते. हॉस्टिंग मशीन KONE EcosDisk® MX100 बसवण्यात आले आहे. हे केवळ अतिशय मजबूत आणि टिकाऊच नाही तर ऊर्जा बचतदेखील करते. लिफ्टमध्ये KONE E-Link™ बसवलेले आहे. एक सर्वसमावेशक सुविधा व्यवस्थापन करणारे हे साधन आहे. यामुळे दुरुनच लिफ्टचे निरीक्षण करण शक्य होते.

elevator 1

( हेही वाचा: महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइनने नाकारलं होतं इस्राइलचं राष्ट्रपतीपद )

जगातील सर्वात मोठ्या लिफ्टची ही आहेत वैशिष्ट्ये 

25.78 चौरस मीटरची ही लिफ्ट एका खोलीइतकी मोठी आहे. या लिफ्टला मध्यभागी उघडणारा 4-पॅनलचा दरवाजा आणि सर्वांगीण निसर्गरम्य दृश्य दाखवणा-या काचेच्या भिंती आहेत. या लिफ्टमधून एकावेळी 100 जण जाऊ शकतात. माहितीसाठी दोन स्क्रीन आहेत, ज्या इमारतीबाबत बातम्या आणि अपडेट्स देतात. जिओ वर्ल्ड सेंटर डेकोरमध्ये मध्यवर्ती असलेल्या लोटस थीमशी आतील रचना जुळते. या लिफ्टच्या मध्यभागी अत्यंत मोहक प्रकाशीय क्रिस्टल बसवण्यात आले आहे. ही लिफ्ट म्हणजे अभियांत्रिकी, कला आणि आर्किटेक्चर यांचे परिपूर्ण मिश्रण असलेली निर्मिती आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.