लग्न समारंभात चोरी! तरुणाने दाखवलेल्या धाडसामुळे असा पकडला चोर

96

लग्नाच्या हॉल मध्ये चोरी करणाऱ्या चोराने हल्ला केल्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या तरुणाने धाडस दाखवून या चोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना गुरुवारी माटुंगा येथे घडली. या तरुणाच्या धाडसाचे पोलिसांनी कौतुक करत त्याचा सत्कार केला आहे. माटुंगा पोलिसांनी चोराला शस्त्रासह अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

( हेही वाचा : बेस्ट कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी भाजप करणार पोल-खोल आंदोलन )

पोलिसांनी केले तरूणाच्या धाडसाचे कौतुक

माटुंगा येथील पाच गार्डन या ठिकाणी असलेल्या पालनकोट हॉलमध्ये बुधवारी लग्न सोहळा सुरू असताना एक चोर हॉलमधून मोबाईल पर्सची चोरी करून पळून जात असताना हॉलमधील मंडळी चोर चोर ओरडू लागली. हॉलच्या बाहेर असणाऱ्या दर्शन जुनगरे (२१) याने चोराला बाहेर पळताना बघून चोराच्या वाटेत मोटारसायकल आडवी टाकली, चोराने जवळील शस्त्र काढून दर्शनवर सपासप वार करून पळून जाण्याचा प्रयत्न केला, हल्ल्यात जखमी होऊन सुद्धा दर्शनने चोराला मिठी मारून पकडून ठेवले, त्याच वेळेस हॉलमधील सगळी मंडळी धावत आली आणि चोराला पकडून ठेवले.

या घटनेची माहिती मिळताच माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन शस्त्रधारी चोराला ताब्यात घेऊन जखमी दर्शन याला उपचारासाठी सायन रुग्णालयात नेले. ताब्यात घेण्यात आलेल्या चोराचे नाव सुरेंद्र जाधव असे असून त्याला चोरीच्या मालासह अटक करण्यात आली आहे. दर्शन जुनगरे याने दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत असून पोलिसांनी त्याच्या धाडसाचे कौतुक करीत पोलिसांनी त्याचा सत्कार केला. दर्शन याने जखमी अवस्थेत देखील दाखवलेल्या धाडसाचे कौतुक करण्यात आले असून त्याची दखल पोलिसांकडून घेण्यात आली असल्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक चव्हाण यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.