शहरात रिक्षाने फिरत असाल तर सावधान!

168

शेगाव नाका ते पंचवटी, जास्तीत जास्त दीड ते दोन किलोमीटरचे अंतर आहे. या मार्गावरच रिक्षात बसलेल्या दोन महिलांचे वेगवेगळ्या दिवशी काही, चोरट्या महिलांनी दागिने लंपास केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये एका महिलेचे ३१ ग्रॅमचे तर दुसऱ्या महिलेचे तब्बल ७३ ग्रॅमचे असे एकूण १०४ ग्रॅमचे दागिने चोरीला गेले आहेत.

प्रसाद लक्ष्मणराव देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांच्या पत्नी २२ जानेवारीला दुपारी दोन वाजेच्या सुमारास शेगाव नाक्यावरून बसस्टॉपवर येण्यासाठी एका प्रवासी रिक्षामध्ये बसल्या होत्या. दरम्यान, काही अंतरानंतर याच रिक्षात आणखी तीन महिला बसल्या. काही अंतरावर त्या तीन महिला रिक्षामधून खाली उतरल्या. नंतर प्रसाद देशमुख यांच्या पत्नीसुद्धा खाली उतरल्या. त्यावेळी त्यांना लक्षात आले की, गळ्यात घातलेले ९० हजार रुपये किंमतीचे ३१ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र गळ्यात नाही. त्यामुळे मंगळसूत्र त्या अनोळखी तीन सहप्रवासी महिलांनीच चोरले याची खात्री त्यांची झाली, या प्रकरणी प्रसाद देशमुख यांनी शनिवारी दिलेल्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच अशाचप्रकारची दुसरी घटना २४ जानेवारीला घडली.

( हेही वाचा : गँगस्टर छोटा शकीलचा आवाज खरा नव्हता! सीआयडी तपासातून उघड )

भितीचे वातावरण

दोन महिला २४ जानेवारीला दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास कठोरा नाका येथून पंचवटी चौकात येण्यासाठी प्रवासी रिक्षामध्ये बसल्या, शेगाव नाका येथे याच रिक्षात आणखी दाेन अनोळखी महिला बसल्या. दरम्यान, पंचवटी चौकात त्या दोन महिला खाली उतरल्या. त्याचवेळी कठोरा नाका येथून बसलेल्या महिलादेखील खाली उतरल्या. त्यावेळी कठोरा नाका येथून बसलेल्या एका महिलेच्या बॅगमध्ये असलेला ७० ग्रॅम वजनाचा चपला हार व ३ ग्रॅमची पोथ असा एकूण ७३ ग्रॅमचा ऐवज त्या दोन महिलांनी लंपास केला आहे. या सोन्याच्या दागिन्यांची किंमत १ लाख ८२ हजार ५०० रुपये आहे. या प्रकरणी सुद्धा महिलेने शनिवारी गाडगेनगर पोलिसांत तक्रार दाखल केली. या दोन्ही प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अवघ्या दीड ते दोन किमीच्या प्रवासात प्रवासी रिक्षातून तीन दिवसात दोन चोरीच्या घटना घडल्यामुळे महिलांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.