यंदा मुंबईला दरडींची भिती : पाच वर्षानंतर सर्व्हेची अंमलबजावणी

87

मुंबईत पावसाळ्यात डोंगराळ भागात दरड कोसळून होणाऱ्या दुघर्टनांच्या पार्श्वभूमीवर जिऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्यावतीने करण्यात आलेल्या सर्व्हेला पाच वर्षे उलटत आली तरी या धोकादायक दरडीच्या ठिकाणी भिंत बांधण्याससह इतर उपाययोजना करता आलेली नाही. मुंबईत एकूण २९९ दरडी कोसळण्याच्या ठिकाणे असून त्यातील ७४ ठिकाणे ही अतिधोकादायक म्हणून जाहीर करण्यात आली आहे. यातील प्राधान्य क्रम १ मध्ये ४७ दरडींच्या ठिकाणी भिंत उभारण्यात येणार असून यासाठी महाराष्ट्र आपत्कालिन व्यवस्थापनाने जिल्हा नियोजन समितीकडे निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे मुंबईतील ७४ डोंगर पट्टयातील दरडींकडे विशेष लक्ष मुंबई महापालिकेसह सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयांचा आहे.

( हेही वाचा : महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदासाठी या मोठ्या नेत्याच्या नातेवाईकाची चर्चा )

उपाययोजना आखण्याचा निर्णय

मुंबईत अनेक डोंगराळ भाग असून या डोंगराळ भागात वस्त्या उभ्या राहिल्या आहेत. तर अनेक डोंगराच्या पायथ्याशीही वस्त्या उभ्या राहिल्याने बऱ्याचदा पावसाळ्या डोंगर भागातील जमिनीचा भाग खचल जावून दुघर्टना संभवते. त्यामुळे सन २०१७मध्ये मुंबईतील दरडीच्या ठिकाणांचा सर्व्हे करून धोकादायक आणि अतिधोकादायक ठिकाणांची यादी बनवण्यात आली होती. परंतु पाच वर्षांमध्ये या सर्वेकडे राज्य शासनाने लक्षच दिले नाही. मुंबईत २९९ दरडींची ठिकाणी निश्चित करण्यात आली आहे, त्यातील ७४ ठिकाणे ही धोकादायक असून त्यातील ४७ दरडींच्या ठिकाणी प्राधान्य क्रम अंतर्गत उपाययोजना आखण्याचा आणि प्राधान्य दोनमध्ये २५ दरडींच्या ठिकाणी उपाययोजना आखण्याचा निर्णय घेतला आहे. या७४ पैंकी १५ दरडींची ठिकाणे ही शहर भागातील असून उर्वरीत सर्व उपनगरांमधील आहेत.

विशेष म्हणजे जिऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने केलेल्या यादीतील धोकादायक यादीत असलेल्या भांडुपमधील मुन्शी नगर आणि चेंबूरमधील भारत नगर याठिकाणी मागील वर्षी दरड कोसळून दुघर्टना घडली. यामध्ये काही जण मृत्यू पावले तर काही जण जखमी झाले होते. याशिवाय विक्रोळी सुर्यानगर येथेही दरड कोसळण्याची घटना घडली होती. मागील वर्षीच्या घटना पाहता उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी याठिकाणी भिंत बांधण्यासाठी निधीची तरतूद जिल्हा नियोजन समितीमध्ये केली आहे. त्यामुळे म्हाडाचे झोपडपट्टी सुधार मंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या माध्यमातून या भिंतीचे काम जिल्हाधिकारी यांच्या देखरेखीखाली होणार असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान,मुंबईत पावसाळ्यात उदभवणाऱ्या आपत्कालिन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर आपत्कालिन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा व अतिरिक्त अतिरिक्त अश्विनी भिडे आणि अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार यांनी सर्व विभागाच्या सहायक आयुक्तांसह विविध संस्थांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. यामध्ये दरडी कोसळण्याच्या घटनांबाबत धोकादायक दरडींच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्यादृष्टीकोनातून संरक्षक भिंत बांधण्याचे निर्देश दिले आहे. त्यामध्ये प्राधान्य क्रम एक व दोनमध्ये विभागणी करून संरक्षक भिंत बांधण्याचे काम हाती घेतले जाईल असे सांगण्यात आले होते. यासाठी आवश्यक असणारा निधीही जिल्हा नियोजन समितीकडे उपलब्ध असून महाराष्ट्र राज्य आपत्कालिन व्यवस्थापन प्राधिकरणाने निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती.

कामे तातडीने हाती घेण्याचे निर्देश

याबाबत मुंबई उपनगर आपत्कालिन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा व अतिरिक्त अतिरिक्त अश्विनी भिडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मुंबईतील जी काही दरड कोसळण्याची ठिकाणे आहेत, तिथे ‘अ’,’ब’ व ‘क’ अशाप्रकारे वर्गवारी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवली जावी अशाप्रकारे निर्देश संबंधितांना दिले आहेत. यामध्ये भिंत बांधणे, दोर बांधणे तसेच मातीची धूप थांबवणे अशाप्रकारच्या ज्या काही उपायोजना करता येईल त्याप्रमाणे आराखडा तयार करावा. तसेच ज्या काही भिंती बांधल्या आहेत, त्या भिंतीमध्ये पाण्याचा निचरा करणारे होल्स मातीमुळे किंवा कुणी बुजवले असतील तर ते त्वरीत मोकळे करावे अशाप्रकारच्या सूचना दिल्या आहे. मात्र, यासाठीचा पुरेसा निधी जिल्हा नियोजन समितीकडे उपलब्ध असल्याने ही कामे तातडीने हाती घेण्याचे निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले.

  • मुंबईतील एकूण दरडींची एकूण ठिकाणी : २९९
  • धोकादायक असलेली ठिकाणे : ७४
  • प्राधान्याने भिंत बांधणे आवश्यक असलेली ठिकाणे : ४७
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.