घराच्या भिंतीवर आपल्याला बऱ्याचदा कोळी नजरेस पडतात. पण तुम्हाला माहित आहे का, तुमच्या घरात सर्रास दिसणारा कोळी कोणत्या जाती किंवा प्रजातीचा आहे? नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, पृथ्वीवर कोळ्यांच्या तब्ब्ल 50 हजार प्रजाती आहेत. इतकेच नाही तर ही मोजणी अजूनही सुरू असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. घराच्या छतावर एका कोपऱ्यात लटकलेल्या जाळ्यात कोळी पाहून तुम्ही कधीतरी अस्वस्थ झाला असालच ना… तुम्हाला माहिती आहे का, पृथ्वीवर कोळ्यांच्या पाळीवपासून ते विषारी अशा 50 हजार प्रजाती आहेत? अलीकडे, नवीन प्रजातींच्या शोधामुळे त्यांची संख्या 50 हजारांवर पोहोचली आहे. चला जाणून घेऊया कोळ्यांच्या जगाबद्दल…
हजारो प्रजाती असलेल्या प्राण्यांपैकी कोळी एक
हजारो प्रजाती असलेल्या प्राण्यांपैकी कोळी हा एक आहे. वर्ल्ड स्पायडर कॅटलॉग (WSC) ने 6 एप्रिल 2022 रोजी घोषित केले की, त्यांना स्पायडरच्या 50 हजार प्रजाती सापडल्या आहेत. आता पृथ्वीवर कोळ्यांच्या 50 हजार प्रजाती असून ज्याबद्दल शास्त्रज्ञांना माहिती असल्याचे सांगितले जात आहे. वर्ल्ड स्पायडर कॅटलॉग ही संस्था स्वित्झर्लंडची राजधानी बर्न येथील नॅचरल हिस्ट्री म्युझियममधून काम करते. त्यांनी कोळ्यांच्या प्रजातींच्या यादीत 50 हजाराव्या क्रमांकावर गुर्युरियस मिनुआनो नावाची प्रजाती नोंदवली आहे. हा स्पायडर साल्टिसाइड कुटुंबातील जंपिंग स्पायडर आहे. जो ब्राझील, उरुग्वे आणि ब्युनोस आयर्सच्या आसपासच्या जंगलात आणि झुडपांची शिकार करतो.
पुढील 100 वर्षांत कोळ्यांच्या आणखी प्रजाती आढळतील
स्पायडर तज्ज्ञ किम्बर्ले एस. मार्टा आणि त्याच्या ब्राझिलियन साथीदारांनी या कोळ्याचा शोध लावला आहे. या भागात राहणाऱ्या मिनुआनो लोकांच्या नावावरून हे नाव देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र आता मिनुआनो समुदाय नाहीसा झाला आहे. कोळ्याचे पहिले वैज्ञानिक विश्लेषण 1757 मध्ये करण्यात आले होते. कोळ्यांच्या 50 हजार प्रजाती शोधण्यासाठी 265 वर्षे लागली. आता त्यांना शोधण्याच्या कामाचा वेग वाढला असून शास्त्रज्ञांना खात्री आहे की, पुढील 100 वर्षांमध्ये कोळ्यांच्या आणखी कितीतरी प्रजाती शोधल्या जातील. दरम्यान, किम्बर्ले मार्टा यांनी सांगितले की अशा अनेक प्रजाती सहज शोधू शकतो. कोळी ही पृथ्वीवरील सर्वात महत्वाची प्रजाती असून शिकारी आहेत. पृथ्वीच्या परिसंस्थेत त्यांचे मोठे योगदान आहे. ते दरवर्षी 400 ते 800 दशलक्ष टन कीटक खातात. जर ते नसतील तर कीटकांच्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणारा एक महत्त्वाचा दुवा नाहिसा होईल. म्हणजेच हे कोळी मानवांसाठी फायदेशीर असल्याचे देखील शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community