सहप्रवाशाला हेल्मेटसक्ती, नियमात होणार हे बदल

शहरात मोटारसायकल स्वारासह सहप्रवाशाला हेल्मेटसक्ती केल्यामुळे मुंबईत अनेकांनी वाहतूक विभागाच्या या निर्णयाला विरोध करीत नाराजी व्यक्त केली आहे. मात्र वाहतूक विभागाने हेल्मेटसक्ती कायम ठेवून त्यात काहीसे बदल घडवून आणले आहेत. लवकरच हेल्मेटसक्तीची नियमावली लागू करण्यात येणार आहे.

सहप्रवाशाला हेल्मेटसक्ती नको, अशी मागणी 

मुंबईत असणारी वाहतूक कोंडी,रस्त्यावरील खड्ड्यामुळे वाहने चालविणे अवघड असताना, मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून सहप्रवाशाला हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. या हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी गुरुवारी लागू करण्यात आली आहे. मात्र सहप्रवाशाला असणारी हेल्मेटसक्ती मागे घेण्यात यावी यासाठी विरोधी पक्षाचे आमदार अतुल भातखलकर यांनी आयुक्ताना पत्र लिहले होते. त्याच बरोबर सोशल मीडियावर मुंबईकरांनी वाहतूक विभागाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. अनेकांनी शहरात सहप्रवाशाला हेल्मेटसक्ती नको, हवे तर महामार्गावर हेल्मेटसक्ती लागू करा असेही सुचवले होते.

( हेही वाचा : पाऊस आला रेल्वे थांबली…मध्य रेल्वे विस्कळीत)

अखेर मुंबई वाहतूक विभागाने हेल्मेटसक्तीच्या निर्णय कायम ठेवत त्यात थोडा बदल करण्यात येत असल्याचे समजते. मुंबईत सहप्रवाशाला हेल्मेटसक्ती नसणार मात्र पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर हे हेल्मेटसक्तीचे नियम लागू असणार आहे. लवकरच मुंबईत कशाप्रकारे हेल्मेटसक्ती असणार याची रूपरेषा कळवण्यात येईल तो पर्यत ही हेल्मेटसक्ती मुंबईत सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here