गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत असलेल्या औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्यांची नावे बदलण्याचा निर्णय अखेर राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता औरंगाबादची संभाजीनगर तर उस्मानाबादची धाराशीव अशी नवी ओळख निर्माण होणार आहे. अनेक खटाटोप केल्यानंतर हा नामांतरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. पण याआधीही राज्यातील काही जिल्ह्यांची नावे बदलण्यात आली आहेत. कोणते आहेत ते जिल्हे?
कुलाब्याचे झाले रायगड
संयुक्त महाराष्ट्राची स्थापना होण्याआधी मुंबई आणि गुजरात मिळून द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात होते. त्यावेळी कोकण प्रशासकीय विभागात असलेला सध्याच्या रायगड जिल्ह्याचे नाव कुलाबा असे होते. पण संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर 1 जानेवारी 1981 रोजी कुलाबा जिल्ह्याचे नाव रायगड असे करण्यात आले. याच वर्षी 1 मे 1981 रोजी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन सिंधुदुर्ग तर औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन जालना या नव्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली होती.
(हेही वाचाः EPFO: रोजंदारी करणा-या मजूरांनाही मिळणार दरमहा 3 हजार रुपये पेन्शन, काय आहे योजना?)
चांदा जिल्ह्याचे विभाजन
महाराष्ट्राची पूर्वेकडून पश्चिमेकडे चांदा ते बांदा अशी ओळख आहे. विदर्भातील सध्याचे गडचिरोली आणि चंद्रपूर हे दोन्ही जिल्हे मिळून चांदा असा एकच जिल्हा पूर्वी होता. पण 26 ऑगस्ट 1982 ला या जिल्ह्याचे विभाजन होऊन गडचिरोली हा नवा जिल्हा स्थापन करण्यात आला, तर चांदाचे नाव चंद्रपूर असे करण्यात आले.
Join Our WhatsApp Community