2023 चा अर्थसंकल्प बनवण्यासाठी ‘या’ पाच जणांनी केली अर्थमंत्र्यांना मदत

210

फेब्रुवारी महिन्याच्या 1 तारीखला अर्थसंकल्प सादर केला जातो. परंतु तो बनवण्याचे काम काही महिन्यांपासून सुरु असते. अर्थसंकल्प 2023 तयार करणा-या निर्मला सीतारमण यांच्या कोअर टीममध्ये निर्मला सीतारमण यांच्यासहीत एकूण सहा जणांचा समावेश आहे. अर्थमंत्री वगळता या कोअर टीममध्ये कोणत्या पाच व्यक्तींचा समावेश आहे, जाणून घेऊयात.

अर्थमंत्र्यांची कोअर टीम

  • टी.व्ही. सोमनाथन ( TV Somanathan)
  • अजय सेठ ( Ajay Seth)
  • तुहिन कांत पांडे (Tuhin kanta Pandey)
  • विवेक जोशी (Vivek Joshi)
  • वी अनंत नागेश्वरन (V Ananth Nageswaran)

टी.व्ही. सोमनाथन ( TV Somanathan)

सर्वात प्रभावशाली सरकारी सचिवांपैकी एक असलेले टीव्ही सोमनाथन हे सध्या फायनान्स सेक्रेट्री म्हणून काम पाहतात. अर्थशास्त्रामध्ये पीएचडी मिळवलेले सोमनाथन हे तामिळनाडू कॅडरचे अधिकारी आहेत. पूर्वी सोमनाथन हे आधी पंतप्रधान कार्यालयामध्ये होते. अर्थ मंत्रालयाच्या व्यय म्हणजेच खर्चासंदर्भातील विभागाची जबाबदारी सोमनाथन यांच्याकडे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्वात विश्वासू अधिका-यांमध्ये सोमनाथन यांचा समावेश आहे.

अजय सेठ ( Ajay Seth)

कर्नाटक कॅडरमधील 1987 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले अजय सेठ हे 2021 पासून अर्थमंत्रालयामध्ये कार्यरत आहेत. ते आर्थिक विषयाचे सेक्रेट्री म्हणून काम पाहतात. अर्थसंकल्पीय भाषणाला अंतिम स्वरुप देण्याची जबाबदारी अजय यांच्या खांद्यावर आहे. आर्थिक विषयासंदर्भातील विभागाचे सेक्रेट्री असल्याने अर्थसंकल्पासंदर्भातील सर्व सल्ले आणि शिफारशींचे विश्लेषण करण्याचे कामही अजयच करतात.

तुहिन कांत पांडे (Tuhin kanta Pandey)

डीआयपीएएम सचिव तुहिन कांत पांडे यांनी एअर इंडियाचे प्रायव्हेटायझेशन आणि भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच एलआयसीचा आयपीओ आणण्याच्या कामामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 2023 च्या अर्थसंकल्पामध्ये भारत सरकारच्या निर्गुंतवणुकीकरणासंदर्भातील आर्थिक नियोजन करण्याची जबाबदारी डिपार्टमेंट ऑफ इनव्सेटमेंट अॅण्ड पब्लिक अॅसेट मॅनेजमेंटचे सेक्रेट्री तुहिन कांत पांडे यांच्या खाद्यांवर आहे. ते 1987 च्या ओडिसा कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत.

विवेक जोशी (Vivek Joshi)

हरियाणा कॅडरचे 1989 च्या बॅचचे अधिकारी असलेला जोशी हे जिनेव्हा विश्वविद्यालयामधून अंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयामध्ये डाॅक्टरेट मिळवली आहे. अर्थ मंत्रालयातील अर्थ विषय सेवांचे सेक्रेट्री असलेले जोशी यापूर्वी गृहमंत्रालयाचे रजिस्ट्रार जनरल अॅण्ड सेन्सरचे कमिश्नर होते. दोन सरकारी बॅंका आणि विमा कंपन्यांच्या खासगीकरणासंदर्भातील व्यवहारांवर जोशीच देखरेख ठेवत होते.

वी अनंत नागेश्वरन (V Ananth Nageswaran)

2023 चे बजेट तयार करण्याबरोबरच 2022-2023 चा आर्थिक सर्व्हे तयार करण्याची जबाबदारी संभाळणारे मुख्य आर्थिक सल्लागार नागेश्वरन हे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे सर्वात विश्वासू सल्लागार आहेत. आयआयएम अहमदाबादमधून एमबीए आणि मॅसॅच्युसेट्स एमरेस्ट युनिव्हर्सिटीमधील फायनान्समध्ये पीएचडी करणारे नागेश्वरन 2019-21 मध्ये प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे पार्ट टाइम मेंबरही होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.