मागच्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात आलेल्या अत्याधुनिक चॅटबॉटने जगात अक्षरश: थैमान घातले होते. अवघ्या पाच दिवसांच्या कालावधीत या चॅटबॉटने दहा लक्ष युजर्स मिळवले होते. सर्वसामान्य माणसाचे आयुष्य या व्हर्च्युअल असिस्टेंटमुळे अधिक सुकर झाले आहे. कोणत्याही प्रश्नाचे सखोल आणि सविस्तर उत्तर देण्याची या चॅटबॉटची क्षमता आहे. मात्र यामुळे शेकडो लोकांची नोकरी जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
ओपनएआयचे चॅटजीपीटी, गुगलचा बिंग, अलीबाबाचा चॅटबॉट यासारखे अनेक चॅटबॉट्स उपलब्ध आहेत. यांच्यामुळे युजर्सला फायदा होत असला तरी लाखो लोकांची नोकरी जाणार आहे. जे कामे करायला आत्ता माणूस लागतो तेच काम आर्टिफिशियल इंटेलिजन्स कमी वेळात, अधिक अचूक आणि कमी पैशात करतो आहे. अॅक्सेंचर, आयबीएम यांनी मागच्या महिन्यात हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकरी कपातीची घोषणा केली होती.
(हेही वाचा – Aadhar : पुण्यात 91 हजार विद्यार्थी बिना ‘आधार’)
तुमची नोकरी जाणार?
काही वर्षांपूर्वी ऑक्सफर्ड विद्यापीठीने एक भाकीत केले होते. त्याच्या मते २० वर्षांच्या आत एआयमुळे अमेरिकेतील ४७% नोकऱ्या नामशेष होतील. त्यांचे अंदाज खरा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या अहवालानुसार २०२५ पर्यंत जगातील ८५ दशलक्ष जॉब्स एआयमुळे नामशेष होणार आहेत. आता माणसाची स्पर्धा माणसाची नाही तर एआयशी आहे. खालील प्रोफेशनमधील व्यक्तींनी आत्ताच ठोस पावले उचलली नाहीत, तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते.
१. प्रफुरिडर
२. शिक्षक
३. कॉपी राइटर
४. सोशल मीडिया मॅनेजर
५. कम्यूटर प्रोग्रामर्स
६. मार्केट रिसर्च अॅनेलिस्ट
७. ट्रे़डर्स
८. ग्राफिक डिजायनर्स
९. अकाऊंटन्ट
१०. कस्टमर सर्विस
हेही पहा –
Join Our WhatsApp Community