भारतात मोठ्या प्रमाणात कोरोना केसेस डबल होत आहेत. येणा-या नव्या दिवसाला कोरोना रुग्णांची संख्या डबल झाल्याचे ऐकायला मिळत आहेत. त्यानुसार भारत आता कोरोनाच्या तिस-या लाटेच्या उंबरठ्यावर उभा असल्याचेच हे भाकित आहे. त्यामुळे कोरोनाच्या मागच्या दोन लाटांच्या तुलनेत तिसरी लाट भयंकर असू शकते .
आर्थिक राजधानीला कोरोनाचा विळखा
महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येचा दिवसागणिक विस्फोट होत असल्याचं दिसून येत आहे. देशभरात एकट्या महाराष्ट्रातच कोरोनाचे 50 टक्के रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे भारताच्या आर्थिक राजधानीत कोरोनाची रुग्ण संख्या प्रचंड वाढली आहे. आधी आलेल्या दोन लाटांच्या तुलनेत, आता मुंबईतील कोरोना केसेस 70 टक्के अधिक वेगाने वाढत असल्याचे समोर आले आहे.
( हेही वाचा :…तोपर्यंत राज्यात लाॅकडाऊन लागणार नाही – राजेश टोपे )
केवळ चार दिवसांत रुग्ण संख्या होतेय डबल
आकडेवारीनुसार पहिल्या लाटेदरम्यान, मुंबईत 706 वरुन 1 हजार 367 रुग्ण संख्येसाठी 12 दिवस लागले होते. तेच दुस-या लाटेदरम्यान मात्र 683 वरुन 1 हजार 325 रुग्ण संख्या होण्यासाठी 20 दिवसांचा कालावधी लागत होता. पण आता मात्र हीच रुग्ण संख्या डबल होण्यासाठी केवळ 4 दिवसांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे येणारी तिसरी लाट प्रचंड वेगाने येत असल्याचं दिसून येत आहे. मुंबईत 683 कोरोना रुग्ण संख्येवरुन 1 हजार 377 रुग्ण संख्या होण्यासाठी केवळ चारच दिवस लागले. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट ही महाभयंकर आणि विस्फोटक असू शकते.
Join Our WhatsApp Community