सोशल मीडियावर व्हायरल होण्याच्या नादात ‘या’ मुलाने आपला जीव धोक्यात घातला

173

लाईक्स, शेअर आणि व्ह्यूजच्या नादात अनेक लोक काहीही करायला तयार होतात. विशेषतः तरुण तरुणींमध्ये लाईक्स आणि व्ह्यूजची जणू काही स्पर्धाच लागलेली असते. या लाईक्स व्ह्यूजच्या खेळात कधीकधी जीवावर बेतणार्‍या गोष्टी केल्या जातात. आणि नंतर पश्चाताप करून काही उपयोग नसतो.

अशा प्रकारच्या व्हिडिओजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टंट्स केले जातात आणि त्या माध्यमातून अधिकाधिक व्ह्यूज मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. ‘1000 Reason To Laugh’ या ट्विटर हॅंडअवरुन असा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. जरी काही लोक हा व्हिडिओ हसण्यावर नेत असले तरी हे खूप गंभीर प्रकरण आहे.

या व्हिडिओला अनेक व्ह्यूज आले आहेत आणि या व्हिडिओतील स्टंट मारणार्‍या मुलावर अनेकांनी तोंडसुख घेतलं आहे. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, पाण्याने भरलेला एक ड्रम आहे. एक मुलगा त्या ड्रममध्ये डुबकी मारतो. त्यानंतर जे होतं ते अविश्वसनीय आहे.

त्या ड्रममध्ये दुसरा मुलगा पेट्रोल टाकतो आणि आग लावली जाते. पाण्यात असलेला मुलगा आपला श्वास रोखून ठेवतो. थोड्या वेळाने त्याला श्वास घ्यायला त्रास होतो. म्हणून तो पाण्याच्या वर येतो तर त्याच्या केसाला आग लागते. मग आग विझवण्यासाठी प्रयत्न केले जातात. सुदैवाने काही वेळाने आग विझवली जाते. अशाप्रकारे त्या मुलाचा जीव वाचतो. पण लाईक्स, व्ह्यूजचा हा खेळ दिवसेंदिवस जीवघेणा होत आहे. यावर जनजागृती करायला हवी आणि प्रबोधनही करायला हवे.

हा धोकादायक स्टंट पाहा

(हेही वाचा – धूम्रपान करू नका सांगितल्यावर माथेफिरूने थेट विमानाचा दरवाजा उघडण्याचा केला प्रयत्न! पुढे घडले असे…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.