तरुणांमध्ये आजही स्टाईल स्टेटमेंट असणा-या फेट्याच्या जन्माची कहाणीही तितकीच भारी आहे. आजही तरुणाई प्रचंड आवडीने फेटे परिधान करते. राजा महाराजांच्या काळात जितकं या फेट्यांवर प्रेम केलं जात होतं, आजही तितकचं या फेट्याचं क्रेज आहे. मराठ्यांची ओळख असणा-या या फेट्याचा इतिहास जाणून घेऊया.
महाराष्ट्रातील राजघराण्यांनी फेटा घालण्याचा एक ऐतिहासिक वारसा आपल्याला दिला आहे. म्हणूनच आपल्या पारंपारिक वेशभूषेत फेट्याला एक महत्त्वाचे स्थान आहे. या फेट्याचा आजवरचा प्रवास अतिशय रंजक राहिला आहे. सर्वात आधी फेट्याचा वापर पेशव्यांच्या काळात झाला होता. ज्याचे पुरावे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई त्याचप्रमाणे संत तुकाराम.
( हेही वाचा: राजद्रोहाचा पहिला गुन्हा कोणावर दाखल करण्यात आला होता माहित आहे का? )
शिवाजी महाराजांच्या काळात कोल्हापुरात या फेट्याचा उगम झाला होता, जी आता महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी म्हणून ओळखली जाते. जुन्या काळात फेटा हा केवळ कुटुंबातील वरिष्ठ पुरुषच घालायचे. ते त्यांच्याप्रती असलेला आदर, कृतज्ञता आणि प्रतिष्ठा दर्शवण्याचा मार्ग होता. त्याकाळी ही एक सांस्कृतीक परंपरा समजली जायची. फेट्याची लांबी ही साधारण 3.5 ते 6 मीटरपर्यंत असते आणि रुंदी 1 मीटर एवढी असते.
जसजसा काळ बदलतोय तसतशी या फेट्याची स्टाईलदेखील बदलत चालली आहे. आताच्या पिढीसाठी तो ऐतिहासिक पारंपारिक वेशभूषेचा भाग म्हणून, नाही तर फॅशन स्टेटमेंट झाला आहे. आता हा वारसा नसून एक ट्रेंड बनला आहे. त्यामुळे आधी साध्या सुध्या असणा-या या फेट्याला आता फॅशनेबल लूक आला आहे.