जगातला सर्वात मजबूत असलेला पूल आपल्या भारतात आहे. हा पूल बांधण्यासाठी कुठल्याही प्रकारचे कृत्रिम साहित्य वापरलेले नाही. हा पूल जिवंत झाडांच्या मुळांपासून तयार केलेला आहे.
भारतात पूर्वोत्तर असलेल्या मेघालय राज्यामध्ये हा पूल आहे. हा पूल कोणत्याही मोठ्या इंजिनिअरने तयार केलेला नाही. तर तिथलेच स्थानिक लोक असा जिवंत झाडांच्या मुळापासून पूल तयार करण्यासाठी तरबेज आहेत. जवळजवळ दोनशे वर्षांपासून हा पूल तितक्याच मजबुतीने टिकला आहे. झाडांची मुळे एकमेकांत गुंतवून तयार केलेला हा पूल दिवसेंदिवस जास्त मजबूत होत आहे.
(हेही वाचा Muslim : आधीच ११ मुले, २२ नातवंडांची आजी असलेल्या ६२ वर्षीय रोकैयाने २७ वर्षीय महंमदशी केले लग्न!)
मेघालय राज्यात पूर्वापार पासून राहणाऱ्या खासी आणि जयंतीया जातीचे लोक असा पूल बनवण्यासाठी तरबेज आहेत. या मजबूत पुलावरून एकावेळी पन्नास लोक एकत्र चालू शकतात. मेघालयातील दात जंगलातून वाहणाऱ्या नदीवर हा पूल बांधण्यात आला आहे. या पुलावरुन एकत्र ५० लोक लाचू शकतात इतका हा पूल मजबूत आहे.
या पुलाचा काही भाग सतत पाण्याखाली राहत असल्याने तो भाग सडून त्याठिकाणी नवी मुळे तयार होतात. आशा प्रकारे हा पूल स्वतःचीच काळजी घेऊन वर्षानुवर्षे मजबुतीने उभा राहिला आहे. या पुलाच्या काही मुळांची लांबी 100 फुटांपर्यंत आहे. जेव्हा ही मुळे पूर्णतः मजबूत होतात तेव्हा ती पुढील 500 वर्षांपर्यंत टिकून राहतात. हा पूल इतकी वर्षे टिकून राहण्यामागे हे एक महत्त्वाचं कारण आहे.