या बिबट्याने दीड महिने दिली वनविभागाला तुरी, अखेर झाला जेरबंद

147

चंद्रपूरातील कोळसा खाणीत मानवी वस्तीजवळ येणाऱ्या बिबाट्याला तब्ब्ल दीड महिन्यांनी पकडण्यात शनिवारी सकाळी वनविभागाला यश आले. गेली दीड महिने हा बिबट्या वनविभागाला तुरी देऊन पळत होता. पिंजरा पाहून त्याच्यावर बसणे, पिंजऱ्याच्याजवळ येऊन एक टक पाहणे असे करत बिबाट्याने वनविभागाला तब्बल दीड महिने तंगवत होता. आज सकाळी भल्या पहाटे बिबट्या तावडीत आल्यानंतर वनाधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

( हेही वाचा : कोरोना पुन्हा काढतोय डोकं वर! महाराष्ट्रासह पाच राज्यांना केंद्राचा अलर्ट )

चंद्रपुरात कोळसा खाणीनजीकच्या मानवी वस्तीत सहज शिकार मिळवण्यासाठी या बिबट्याने जवळपास रोजच संचार सुरु ठेवला होता. बिबट्याने दुर्गापूर, समतानगर आणि शक्तीनगर मध्ये येणे जाणे सुरूच ठेवले होते. मात्र बिबट्याच्या हल्ल्यात 16 वर्षांच्या मुलाचा बळी गेल्यानंतर संतापलेल्या जमावाने बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली. त्यानंतर बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षांच्या मुलाचा बळी गेल्यानंतर मात्र पुन्हा वनविभाग बिबट्याला पकडण्यासाठी कामाला लागले. त्याला पकडण्यासाठी पाच पिंजरे लावले गेले. अखेर शनिवारी सकाळी बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती वनविभागाने दिली.

अशी झाली बिबट्याची फजिती

बिबट्याला पकडण्यासाठीचे सर्व प्रयत्न फसत असताना वनविभागाने झाडाझुडपात पिंजरा लपेल अशा पद्धतीने पिंजरा लपवला. अखेर बिबट्या शनिवारी सकाळी पिंजऱ्यात अडकला.

सात वर्षांच्या नर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले असून, त्याला चंद्रपूर येथील ट्रान्सिट कॅम्प मध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
प्रशांत खाडे, विभागीय वनाधिकारी, वनविभाग ( प्रादेशिक )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.