मे महिन्याचा उकाडा असह्य होत असताना भारतीय वेधशाळेने आनंदाची बातमी दिली आहे. यंदा केरळात वेळेआधी मान्सून दाखल होईल, अशी खुशखबर भारतीय वेधशाळेने दिली आहे. भारतात केरळमार्गे नैऋत्य मोसमी वा-यांमुळे पाऊस पडतो. केरळमार्गे भारतात प्रवेश कऱणारे नैऋत्य मोसमी वारे २७ मे रोजी दाखल होतील. मान्सून आगमनाला कदाचित चार दिवस आधीचा मुहूर्त किंवा विलंब होऊ शकतो, अशी पूर्वकल्पनाही भारतीय वेधशाळेने दिली आहे.
( हेही वाचा : आता आम्ही काय खायचे? बेस्ट कामगार झाले संतप्त! )
भारतीय वेधशाळा एप्रिल महिन्याच्या पंधरवड्यात मान्सूनच्या आगमनाबाबत तसेच जून ते सप्टेंबर महिन्यात अपेक्षित पावसाच्या अंदाजाचा पूर्वानुमान जाहीर करते. आज भारतीय वेधशाळेने बंगालच्या उपसागरातील तसेच श्रीलंकेजवळील पावसासाठी तयार होणा-या अनुकूल वातावरणाचा अभ्यास करत केरळात दाखल होणा-या नैऋत्य मोसमी वा-यांच्या आगमनाची अंदाजित तारीख जाहीर केली. साधारणतः केरळाच्या आगमानाची नैऋत्य मोसमी वा-यांची तारीख १ जून समजली जाते. परंतु यंदा केरळात वेळेअगोदरच मान्सून जाहीर होत असल्याचे निकषांच्या आधारे जाहीर केल्याचे भारतीय वेधशाळेने सांगितले.
गेल्या काही वर्षांतील केरळातील मॉन्सून दाखल होण्याचा अंदाजाबाबत –
- वर्ष – मॉन्सून दाखल झाल्याची तारीख – अंदाजित तारीख
- २०१७ – ३० मे – ३० मे
- २०१८ – २९ मे – २९ मे
- २०१९ – ८ जून – ५ जून
- २०२० – १ जून – ५ जून
- २०२१ – ३ जून – ३१ मे