यंदा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार डिसेंबरमध्ये पुण्यात रंगणार

156

महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची आणि कुस्तीचा कुंभमेळा असणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार वर्षअखेरीस डिसेंबरमध्ये रंगणार आहे. यंदा या स्पर्धेच्या आयोजनाची संधी संस्कृती प्रतिष्ठानला मिळाली असल्याचा आनंद असून, कोथरूडमध्ये ही स्पर्धा भव्य स्वरूपात करण्याचा मानस आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचे मुख्य संयोजक व संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, स्व. मामासाहेब मोहोळ यांच्या संकल्पनेतून आणि दूरदर्शी विचारातून ‘महाराष्ट्र केसरी’ ही स्पर्धा सुरू झाली आणि आज मोठ्या शिखरावर पोहोचली. त्यात आम्हा मोहोळ कुटुंबीयांकडे या स्पर्धेची जबाबदारी आली, ही निखळ समाधान देणारी बाब आहे. ज्या मामासाहेब मोहोळ यांनी या स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समितीचे अध्यक्ष संजयसिंग यांच्याकडून महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनाचे पत्र स्वीकारले आहे. संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने वर्षाअखेरीस ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.

(हेही वाचा – बार कौन्सिल ऑफ इंडियाकडून न्यायाधीशांचे वय वाढवण्याबाबत ठराव मंजूर)

सलग सहा दिवस या स्पर्धेचा थरार रंगणार असून राज्यभरातील मल्ल एकमेकांशी दोन जणार आहेत. ३३ जिल्ह्यांतील आणि ११ महापालिकांमधील ४५ तालीम संघातील ९०० मल्ल या स्पर्धेच्या आखाड्यात उतरणार आहे. तसेच नामांकित ४० मल्लांच्या अतिशय रंजक अशा लढती पाहण्याची संधी व त्याचा फायदा आपल्या युवा मल्लांना होणार आहे. विविध १० वजनी गटात, माती व गादी विभागात कुस्ती होतील. ९०० खेळाडूंसह ९० व्यवस्थापक, ९० मार्गदर्शक, १२५ तांत्रिक अधिकारी, ९० पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.