थॉमस एडिसन (Thomas Edison) यांचा जन्म १८४७ साली मिलान येथे झाला होता. पण १८५४ साली त्यांचे कुटुंब मिशिगन येथील पोर्ट ह्युरॉन या ठिकाणी स्थलांतरीत झाले. त्यामुळे थॉमस एलन एडिसन हे तिथेच लहानाचे मोठे झाले. थॉमस एडिसन यांच्या आई शाळेत शिक्षिका होत्या. त्यांच्या आईनेच त्यांना वाचन, लेखन आणि अंकगणित शिकवले होते.
(हेही वाचा – Elon Musk to Discontinue Phone No : एलॉन मस्क फोन वापरायचं का सोडणार आहेत?)
लहानपणापासूनच तंत्रज्ञानाची आवड –
लहानपणापासूनच त्यांना (Thomas Edison) तंत्रज्ञानाची आवड निर्माण झाली होती. ते घरी बसून वेगवेगळ्या प्रयोगांवर तासन् तास काम करायचे. एकदा एडिसन यांना लहानपणी खूप ताप आला होता. त्यावेळी त्या तापावर व्यवस्थित उपचार उपलब्ध नव्हते. पुढे त्याचे संक्रमण इतके वाढले की, एडिसन यांना वयाच्या १२व्या वर्षी कानांसंबंधी तक्रारी सुरू झाल्या. एका कानाने त्यांना अजिबात ऐकू येत नव्हते. तर दुसऱ्या कानाने कमी ऐकू यायचे. आपली श्रवणशक्ती कमी झाली असली तरी त्यांनी आपले लक्ष विचलित होऊ दिले नाही. आपल्या कामावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातमध्ये त्यांनी नवीन टेलीग्राफी सिस्टीमवर काम करता यावे म्हणून ‘कूपर युनियन फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स अँड आर्ट’ येथे रसायनशास्त्रच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला होता.
(हेही वाचा – Firing : मुंबईनंतर आता पुणे हादरले; घोसाळकरांच्या हत्येनंतर पुण्यात दुकानदारावर गोळ्या झाडून स्वतःला संपवले)
धावणाऱ्या ट्रेनमध्ये वर्तमानपत्रे, कँडी आणि भाज्या विकायचे –
थॉमस एडिसन (Thomas Edison) यांनी सुरुवातीला अनेक वेगवेगळी कामं केली. ते पोर्ट ह्युरॉन ते डेट्रॉईट पर्यंत धावणाऱ्या ट्रेनमध्ये वर्तमानपत्रे, कँडी आणि भाज्या विकायचे. वयाच्या १३व्या वर्षी ते आठवड्याला पन्नास डॉलर एवढी कमाई करायचे. आपल्याला मिळालेल्या कमाईचा बहुतेक भाग ते विद्यूत आणि रासायनिक प्रयोग करण्यासाठी जी उपकरणे हवी असायची, त्या उपकरणांची खरेदी करण्यासाठी वापरायचे.
नोकरी सांभाळून रासायनिक प्रयोग सुरूच –
१५ वर्षाचे असताना एडिसन एका ३ वर्षांच्या बाळाला ट्रेन ऍक्सीडेंटपासून वाचवले होते. त्या बाळाचे वडील तिथले स्टेशन एजंट होते. त्यांनी आपली कृतज्ञता दाखवण्यासाठी एडिसन यांना टेलिग्राफ ऑपरेटरचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर ते टेलिग्राफ ऑपरेटर म्हणून नोकरीला लागले. आपली नोकरी सांभाळून त्यांनी वेगवेगळे रासायनिक प्रयोग (Thomas Edison) करणे सुरूच ठेवले.
(हेही वाचा – Acharya Pramod Krishnam : शिस्तभंग आणि पक्षविरोधी कारवाया, कॉंग्रेस कडून आचार्य प्रमोद कृष्णम यांची हकालपट्टी)
१८६६ साली म्हणजेच वयाच्या १९व्या वर्षी एडिसन (Thomas Edison) हे केंटकी येथील लुईव्हिल येथे गेले. तिथे त्यांनी असोसिएटेड प्रेस ब्युरो न्यूज वायरमध्ये वेस्टर्न युनियनचे कर्मचारी म्हणून काम केलं. एडिसन यांनी आपल्याला नाईट शिफ्ट देण्यात यावी अशी विनंती केली. त्यामुळे काय झाले की, त्यांना आपल्या दोन अतिशय आवडत्या गोष्टींमध्ये रमण्यासाठी भरपूर वेळ मिळाला. त्या गोष्टी म्हणजे, वाचन करणं आणि वेगवेगळे रासायनिक प्रयोग करणं.
एडिसन (Thomas Edison) यांचे पहिले पेटंट इलेक्ट्रिक व्होट रेकॉर्डरसाठी होते. हे पेटंट १ जून १८६९ साली मंजूर करण्यात आले होते. त्या यंत्राची फारशी मागणी नव्हती. त्यानंतर एडिसन न्यूयॉर्क शहरात गेले. तिथे सुरुवातीच्या काळात त्यांचे मार्गदर्शक फ्रँकलिन लिओनार्ड पोप हे होते. ते एक सहकारी टेलिग्राफर आणि संशोधक होते. एडिसन यांनी गोल्ड इंडिकेटर येथे सॅम्युएल लॉजसाठी काम केलं. त्यानंतर त्यांनी ऑक्टोबर १८६९ साली इलेक्ट्रिक इंजिनिअर आणि संशोधक म्हणून काम केलं आणि स्वतःची कंपनी स्थापन केली. पुढे त्यांनी १८७४ साली एक मल्टीप्लेक्स टेलिग्राफिक टेक्नॉलॉजी विकसित करण्यास सुरुवात केली. ही टेक्नॉलॉजी एकाच वेळी दोन संदेश पाठवू शकत होती.
(हेही वाचा – Bharat Ratna : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची खासदार राहुल शेवाळे यांची लोकसभेत मागणी)
महान संशोधक आणि व्यापारी –
थॉमस एडिसन (Thomas Edison) हे एक महान संशोधक आणि व्यापारी होते. त्यांनी इलेक्ट्रिक पॉवर, साऊंड रेकॉर्डिंग, मोशन पिक्चर, फोनोग्राफ यांसारख्या अनेक उपकरणे विकसित केली आहेत. विशेष म्हणजे पहिला बल्ब त्यांनी निर्माण केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community