चीनमधील वाढता कोरोनाचा उद्रेक बघता केंद्र सरकार सध्या अलर्ट मोडवर आहे. या कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येनंतर केंद्रासह राज्य सरकारकडून पुन्हा एकदा नागरिकांना बू्स्टर डोस घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अशातच गेल्या आठवड्यात भारत बायोटेकच्या नाकावाटे देण्यात येणाऱ्या कोरोना लसीला मंजुरी मिळाली आहे. नाकावाटे देण्यात येणाऱ्या या लसीची किंमत १ हजार रूपये असणार आहे. यामध्ये लसीची किंमत ८०० रूपये तर २०० रूपये जीएसटी, रूग्णालयाचे चार्ज असणार आहे. दरम्यान, ही लस कोणाला घेता येणार याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. भारताचे वॅक्सिन टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. एन के. अरोरा यांनी अशी माहिती दिली की, भारतात ज्यांनी बूस्टर डोस घेतला आहे. अशा लोकांना नेझल व्हॅक्सिन म्हणजे नाकावाटे देण्यात येणारी कोरोना लस दिली जाणार नाही.
(हेही वाचा – थर्टीफर्स्टसाठी मुंबईकरच नाही तर पोलीसही सज्ज! मुंबईत 100 ठिकाणी नाकाबंदी, ‘हे’ मार्ग राहणार बंद)
कोरोना रूग्णांमध्ये पुन्हा वाढ होत असल्याने भारताने कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची तयारी सुरू केली आहे. सरकारने गेल्या शुक्रवारी याच अंतर्गत कोरोनाच्या नेझल वॅक्सिनच्या वापराला मंजुरी दिली आहे. ही लस बूस्टर म्हणून वापरली जाणार असून खासगी रूग्णालयामध्ये प्रथम उपलब्ध होणार आहे. दरम्यान, भारताच्या वॅक्सिन टास्क फोर्सचे प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यांनी बूस्टर डोस घेतला नसेल त्यांना नेझल व्हॅक्सिन घेता येणार आहे.
बूस्टर डोस घेतल्यानंतर बूस्टर घेण्याची गरज आहे का?
आणखी लसींची आवश्यकता असेल की नाही, याचा पुरावा नाही. अगदी ज्या देशांमध्ये लोकांनी तीन लसी घेतल्या आहेत, लसीचे चार किंवा पाच डोस, विशेषतः उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये ही एमआरए लस घेतली आहे. परंतु त्यांनाही वारंवार संसर्ग होत असल्याचे डॉ अरोरा यांनी स्पष्ट केले आहे.
(हेही वाचा – आता नाकावाटे देण्यात येणारी कोरोना लस CoWin ॲपवर उपलब्ध)
Join Our WhatsApp Community