‘बॉम्बा’बॉम्बः मंत्रालय उडवण्याची धमकी! परिसरात खळबळ

रविवार म्हणजे सुट्टीचा वार असल्याने मंत्रालय तसं निवांत असतं. पण मंत्रालयातील एका कक्षात रविवारी दुपारी एक फोन आला आणि मंत्रालयात एकच धावपळ सुरू झाली.

82

राज्याचा कारभार ज्या इमारतीतून चालवला जातो, ज्या इमारतीत सर्वसामान्यांपासून मंत्री महोदयांची रेलचेल असते, त्या मुंबईतील मंत्रालय परिसराला हादरवून टाकणारी एक गोष्ट रविवारी घडली. खरं तर रविवार म्हणजे सुट्टीचा वार असल्याने मंत्रालय तसं निवांत असतं. पण मंत्रालयातील एका कक्षात रविवारी दुपारी एक फोन आला आणि मंत्रालयात एकच धावपळ सुरू झाली. या फोनवरील अज्ञात व्यक्तीकडून मंत्रालयात बॉम्ब ठेवण्यात आला असून, मंत्रालय उडवण्याची धमकी देण्यात आल्याने, मुंबई पोलिसांच्या पथकाने ताबडतोब मंत्रालयाकडे धाव घेतली.

WhatsApp Image 2021 05 30 at 3.17.04 PM

काय घडला नेमका प्रकार?

मंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात रविवार 30 मे रोजी दुपारी १२:४० वाजता अज्ञात व्यक्तीने फोन करुन, मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली. यामुळे मंत्रालय परिसरात एकच खळबळ उडाली. ही माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी मंत्रालयाकडे धाव घेतली. बॉम्ब स्कॉड आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले असून, मंत्रालयातील कानाकोपरा तपासला जात असल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे. तसेच मंत्रालयात आक्षेपार्ह काहीही आढळून आले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

WhatsApp Image 2021 05 30 at 3.17.04 PM 1

कोण आहे ती व्यक्ती?

हा धमकीचा फोन करणा-या इसमाचा शोध पोलिसांना लागला आहे. नागपूर येथील सागर काशिनाथ मंदरे या व्यक्तीने हा धमकीचा फोन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 12 फेब्रुवारी 2020 रोजी या इसमाने आत्मदहनाचा इशारा दिला होता आणि राज्याच्या मुख्य सचिवांना अटक करण्याची मागणी केली होती. सदर तरुणाची मानसिक अवस्था ठीक नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

WhatsApp Image 2021 05 30 at 3.17.06 PMWhatsApp Image 2021 05 30 at 3.17.07 PM

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.