मोठी बातमी: अयोध्येतील राम मंदिर उडवून देण्याची धमकी; अल कायदाने भारतीय मुसलमानांना केले ‘हे’ आवाहन

अवघ्या देशाचे लक्ष लागलेले अयोध्येतील राम मंदिर कधी उघडणार याची तारीख अमित शहा यांनी गुरुवारी सांगितली. त्यानंतर लगेचच दुस-या दिवशी म्हणजेच शुक्रवारी मोठी बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्येतील हे राम मंदिर उडवून देण्याची धमकी अल-कायदा या दहशतवादी संघटनेने दिल्याचे वृत्त समोर आले आहे.

आंतरराष्ट्रीय जिहादी संघटनेने ‘गझवा-ए-हिंद’ या त्यांच्या नियतकालिकात यासंबंधीची धमकी दिली आहे. या नियतकालिकाच्या ताज्या अंकात अल- कायदा ही संघटना अयोध्येतील राम मंदिर तोडून त्याठिकाणी मस्जिद बांधणार असल्याचे म्हटले आहे.

काय आहे नियतकालिकात?

मिळालेल्या माहितीनुसार, सदर नियतकालिक हे 100 पानांचे नियतकालिक आहे. संपादकीयात म्हटले आहे की, ज्याप्रकारे बाबरी मशिदीच्या ढाच्यावर राम मंदिर बांधण्यात येत आहे. ते पाडले जाईल. मूर्तींच्या जागी अल्लाहच्या नावाने बाबरी मशिद बांधली जाईल. या सगळ्यासाठी बलिदान हवे आहे. त्यामुळे भारतातील सर्व मुस्लिमांनी या जिहादमध्ये सहभागी व्हावे.

भारतीय मुसलमानांना आवाहन

अल- कायदाने भारतीय मुसलमानांना आवाहन केले आहे. तुम्ही या मुद्यात भौतिक नुकसानाला घाबरु नका. अनेक दशकांपासून जीवन आणि संपत्तीचे नुकसान आपण झेलेले आहे. हे जीवन जिहादसाठी वापरले असते तर एवढे नुकसान झाले नसते. भारतीय मुस्लिमांनी हे लक्षात ठेवावे. धर्मनिरपेक्षता ही नरकासमान आहे. हिंदू- मुस्लिम भाईचारा हे धोकादायक ठरु शकते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here