Balmohan Vidyamandir School : बालमोहन विद्यामंदिर शाळेतील ३ माजी विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कार्यकारिणीमध्ये समावेश

696
छायाचित्राच्या उजव्या बाजूने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सहकार्यवाह स्वप्नील सावरकर, स्मारकाच्या नवनिर्वाचित अस्थायी विश्वस्त आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नात असिलता सावरकर-राजे आणि श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगडचे अध्यक्ष सुनील पवार.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे प्रखर हिंदुत्व आणि राष्ट्रप्रेमी विचारांचा प्रचार आणि प्रसार स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने केला जातो. याकरिता स्मारकाच्या वतीने अविरतपणे विविध उपक्रम राबवले जातात. आता स्मारकाचा दादर येथील प्रसिद्ध बालमोहन विद्यामंदिर (Balmohan Vidyamandir School) शाळेसोबत संबंध जोडला गेला आहे. या शाळेत शिकलेले अनेक माजी विद्यार्थी आज डॉक्टर, वकील, लेखापाल, उच्च पोलीस अधिकारी आणि सनदी अधिकारी पदावर आहेत. अशा शाळेमध्ये शिकलेल्या तीन माजी विद्यार्थ्यांची स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कार्यकारिणीमध्ये निवड झाली आहे.

savarkar 2 2
स्मारकाचे नवनिर्वाचित अस्थायी विश्वस्त आणि श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगडचे अध्यक्ष सुनील पवार यांचा सत्कार करताना स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर आणि सहकार्यवाह स्वप्नील सावरकर.

(हेही वाचा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदी प्रवीण दीक्षित, तर वीर सावरकर यांची नात असिलता राजे यांच्यासह ५ अस्थायी विश्वस्तांची बिनविरोध निवड)

सावरकरांच्या विचारांचा प्रसार करण्यात बालमोहनच्या माजी विद्यार्थ्यांचा सहभाग  

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नात असिलता सावरकर-राजे आणि श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगडचे अध्यक्ष सुनील पवार यांची स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कार्यकारिणीमध्ये अस्थायी विश्वस्त म्हणून नुकतीच निवड झाली आहे, तर ‘हिंदुस्थान पोस्ट’ मीडिया हाऊसचे संपादक स्वप्नील सावरकर यांची यापूर्वीच सहकार्यवाह पदावर निवड झाली होती. हे तीघेही बालमोहन विद्यामंदिर (Balmohan Vidyamandir School) या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. आता हे बालमोहन विद्यामंदिर शाळेतील तीन माजी विद्यार्थी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कार्यकारिणीमध्ये आले आहेत. २३ डिसेंबर रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी नवनिर्वाचित अस्थायी विश्वस्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नात असिलता सावरकर-राजे आणि श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगडचे अध्यक्ष सुनील पवार यांचा सत्कार करण्यात आला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.