Russia-Ukraine War: पहिल्यांदा रशियन सैन्याने भारतीयांच्या सुटकेसाठी केली ‘ही’ मदत

113

गेले २० दिवस झाल्यानंतरही रशिया-युक्रेन युद्ध अद्याप शांत झालेले दिसत नाही. दरम्यान, रशियाने ताब्यात घेतलेल्या युक्रेनच्या खेरसन शहरातून तीन भारतीयांची सुखरूप सुटका करण्यात आली. रशियन सैनिकांच्या मदतीने ही मोहीम राबवण्यात आली.पहिल्यांदाच रशियन सैनिकांनी युद्धभूमीतून भारतीयांच्या सुटकेसाठी मदत केली आहे. त्यामुळे भारतीयांना आपल्या मायदेशी येता येणं शक्य झाले असून त्यांना दिलासा मिळाला आहे.

रशियन सैन्याने भारतीयांना केली अशी मदत

मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्यांदाच रशियन सैनिकांनी युद्धभूमीतून भारतीयांच्या सुटकेसाठी मदत केली आहे. मॉस्कोमधील भारतीय दूतावासाने या तीन भारतीयांची क्रीमिया आणि मॉस्कोमार्गे सुटका करण्यास मदत केली. या तीन भारतीयांमध्ये एक विद्यार्थी आणि दोन व्यावसायिकांचा समावेश असल्याचे समजतेय. क्रीमियातील सिम्फेरोपोलला जाणाऱ्या बसेसच्या ताफ्यात भारतीयांना बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर ते रेल्वे मार्गे मॉस्कोत आणले आणि तेथून त्यांना भारतात पाठवण्यात आले. या तीन भारतीयांमधील एक विद्यार्थी चेन्नई येथील असून दोन व्यावसायिक अहमदाबाद येथील आहेत.

(हेही वाचा – दुधाने खिसा पोळणार!‘या’ कंपनीच्या दुधाच्या दरात दोन रुपयांची वाढ)

आतापर्यंत  22 हजार भारतीय परतले मायदेशी

माध्यमातून समोर आलेल्या वृत्तांनुसार, भारतात आतापर्यंत जवळपास 22 हजार भारतीय युक्रेनमधून मायदेशी आले आहेत. त्यापैकी 17000 भारतीय केंद्र सरकारच्या विशेष विमानाने भारतात दाखल झाले आहेत. युक्रेनमधून भारतीय पोलंड, हंगेरी, रोमानिया आणि स्लोव्हाक प्रजासत्ताक या देशांत दाखल झाले आणि तेथून भारतात परतले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.