छत्तीसगडमध्ये शनिवारी सकाळी विजापूर जिल्ह्यातील मिरातूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोमरा जंगलात डीआरजी, एसटीएफ आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांसोबत झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले.
विजापूरचे पोलीस अधीक्षक अंजनेय वार्ष्णेय यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून शस्त्रेही जप्त करण्यात आली आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटलेली नाही.
(हेही वाचा – … म्हणून आम्ही कामख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीला जातोय, मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले)
काल, शुक्रवारी संध्याकाळी सुरक्षा दलाचे जवान नक्षलविरोधी मोहिमेवर गेले होते. त्याचवेळी शनिवारी सकाळी आठच्या सुमारास सीआरपीएफ, डीआरजी आणि एसटीएफच्या जवानांमध्ये चकमक झाली. यादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, डीव्हीसीएम मोहन कडती, डीव्हीसीएम सुमित्रा, माटवाड़ा एलओएस कमांडर रमेश आणि 30-40 माओवादी पोमराच्या जंगलात आहेत. या माहितीवरून शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास पोमराच्या जंगलात पोलिसांनी शोधमोहीम राबवली. सध्या ही शोध मोहीम सुरूच आहे. डीआरजी, एसटीएफ आणि केरिपू दलाच्या संयुक्त कारवाईमुळे हे यश मिळाले आहे.