वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात दहा दिवसांत तिघांचा मृत्यू

उष्माघात आणि वन्यप्राण्यांचा हल्ला, चंद्रपूरात जनजीवन होतेय अस्वस्थ

चंद्रपूरात वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात दहा दिवसांत तीन जणांनी आपला जीव गमावला. तिन्ही हल्ले सिंदेवाही भागांत झालेत. यापैकी एक हल्ला वाघाने जंगलात, बिबट्याने घरात घुसून केला. गुरुवारी मध्यरात्री घराबाहेर झोपलेल्या ९० वर्षीय महिलेवर हल्ला केला. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला. गावकरी सध्या चंद्रपूरतील उष्माघात आणि लोडशेडिंगमुळे घराबाहेरील अंगणात झोपत आहेत. त्यातच ही महिला घराबाहेर झोपली असता तिच्यावर वाघाने हल्ला केल्याचे सांगितले जात आहे.

वाघाच्या हल्ल्यात पहिल्या मृत्यूची नोंद

याअगोदरही गावात दोन माणसांचा मृत्यू झाला आहे. जंगलात वाघाच्या हल्ल्यात पहिल्या मृत्यूची नोंद झाली. दुस-या घटनेत बिबट्याने घरात घुसून केलेल्या हल्ल्यात एका गावक-याचा मृत्यू झाला. तिनही घटना लागोपाठ घडल्याने स्थानिकांनी रात्रीच्या वेळेत घरात राहावे, आपल्या पाळीव प्राण्यासह घराबाहेर राहू नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

(हेही वाचा – Money Laundering Case : अनिल देशमुखांचा कोठडीतील मुक्काम वाढला)

वनविभागाकडून रात्रीच्या पहाऱ्यात वाढ

सिंदेवाही गावातही दोन ते तीन वाघांचा वावर आहे. शिवाय जंगल भूभागही जवळ आहे. गावक-यांनी रात्रीच्या वेळी आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन देत वनविभागाने रात्रीचा पहारा वाढवला आहे. यासह गावाजवळ वनविभाग इलॅक्ट्रोनिक साधन लावणार आहे. या साधनाच्या संपर्कात वाघ किंवा बिबट्या आल्यास जोरात आवाज होऊन प्रकाश होईल, जेणेकरुन वन्यप्राणी आल्याचा इशारा गावक-यांना मिळेल, अशी माहिती चंद्रपूर वनविभागाचे विभागीय वनाधिकारी दिपेश मेहता यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here