हिंदू राष्ट्र संघटनेच्या अध्यक्षाच्या हल्ल्याप्रकरणी तीन पोलिसांचं निलंबन

पुण्यातील ससून रुग्णालयात हिंदू राष्ट्र संघटनेचे अध्यक्ष तुषार हंबीर याच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी 3 पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार हंबीर गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे.

तुषारवर खुनासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तुषारची प्रकृती खालावल्याने काही दिवसांपूर्वी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तुषारच्या तब्येतीची विचारपूस करण्याच्या बहाण्याने रुग्णालयात घुसल्यानंतर अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. लक्ष्य चुकवल्यानंतर हल्लेखोरांनी तुषारवर चाकूने वार करण्याचाही प्रयत्न केला. मात्र तेथे तैनात असलेले पोलीस कर्मचारी अमोल बागड यांनी तत्काळ हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न करून तुषार हंबीर याला हल्ल्यापासून वाचवले. यावेळी पोलीस शिपाई अमोल बागड हे गंभीर जखमी झाले.

तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई

या घटनेत पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी तुषार हंबीर याच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या इतर पोलिसांची चौकशी करण्याचे आदेश दिले. तपास अहवालानंतर पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी पोलीस हवालदार पांडुरंग भगवान कदम, पोलीस हवालदार राहुल नंदू माळी आणि सीताराम अहलू कोकाटे यांना निलंबित करण्यात आले आहे. तुषार हुंबीर याच्यावर हल्ला झाल्यानंतर 8 आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक केली. या आरोपींकडे चौकशी केल्यानंतर पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे समोर आले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here