मुंबईतील जुहू चौपाटीवर 4 जण समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यातील एकाला वाचवण्यात यश आले मात्र इतर तीघांचा बुडून मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मंगळवारी संध्याकाळच्या वेळी ही घटना घडली. ही मुले जुहू चौपाटीवर फिरण्यासाठी चेंबुरहून आली होती. मृतांमध्ये दोन सख्खे भाऊ आहेत. एकाला वाचवण्यात आले असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मृतांमध्ये दोन सख्या भावांचा समावेश
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेंबूर येथे राहणारी चार मुले जुहू चौपाटीवर फिरण्यासाठी आली होती. चौपाटीवर समुद्रात खेळत असताना, अचानक चौघे जण पाण्यात बुडाले. पाण्यात बुडालेल्या मुलांचे वय 16 ते 21 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे. अमन सिंग(21), कौस्तुभ गणेश गु्प्ता (18), प्रथमेश गणेश गु्प्ता अशी बुडालेल्या मुलांची नावे आहेत. यामध्ये दोन सख्या भावांचा समावेश आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. एका मुलाला वाचवण्यात यश आले आहे. तर इतर तिघांचा शोध घेतला जात आहे.
( हेही वाचा: मार्केटिंग एक्झीक्यूटिव्ह असलेले कृष्णकुमार कुन्नथ ‘केके’ कसे झाले बॉलीवुडचे सर्वात मोठे गायक? )