थायलंडमध्ये नोकरीसाठी गेलेल्या तीन तरुणांना म्यानमारमध्ये एका बंकरमध्ये डांबून ठेवण्यात आले आहे, या तरुणाचे पासपोर्ट आणि व्हिसा काढून घेण्यात आला असून त्यांचाकड़े ६ हजार डॉलर्स क्रिप्टो करन्सीची मागणी करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली, याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
नोकरीसाठी विचारणा केली आणि…
शबाज खान, याकूब सय्यद आणि साकिब अली सय्यद असे डांबून ठेवण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघे वांद्रे पश्चिम परिसरात राहण्यास आहे. हे तिघे ६ सप्टेंबर रोजी शान बादशहा मन्सुरी (२८) या तरुणाच्या ओळखीने थायलंड येथे रवाना होते. शान बादशाह याचा मित्र नीरज हा दुबई येथे नोकरीला असताना त्याची ओळख इमॅन्युएल बी ग्रीने नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली होती. नीरज याला दुबईत नोकरीवरून काढून टाकल्यानंतर त्याने इमॅन्युएल याला संपर्क साधून त्याच्याकडे नोकरी संदर्भात चौकशी केली, त्यावेळी इमॅन्युएलने तो जायरो इंटरनॅशनल आयजीटी कंपनीचा क्रिप्टो करन्सी सर्व्हिस चॅट प्रोसेस सेल्स एजंट म्हणून भरतीचे काम करतो असे सांगितले. त्यानंतर इमॅन्युएलसोबत संपर्क न झाल्यामुळे नीरज हा मुंबईत निघून आला. मुंबईत आल्यावर निर्जन पुन्हा इमॅन्युएलला संपर्क केला असता त्याच्याशी संपर्क झाला आणि तो मुंबईतच असल्याचे सांगून नोकरी संदर्भात प्रत्यक्ष भेटून बोलू असे सांगितले. दरम्यान इमॅन्युएल आणि नीरज हे दोघे वांद्रे येथील हॉटेल मेट्रो येथे भेटले आणि त्याने आखीव काही मित्र असतील तर त्यांना त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार थायलंड येथे जायरो इंटरनॅशनल कंपनीत नोकरी लावतो असे सांगितले.
(हेही वाचा फक्त हिंदू समाजानेच सगळे सहन करायचे का? – आमदार नितेश राणे)
थायलंड येथे नोकरीचे आमिष दाखवले
नीरज याने शान बादशहा मन्सुरी याला थायलंडच्या नोकरीबाबत सांगितले असता शान बादशहा याने भाऊ आणि नीरज यांच्यासह इमॅन्युएलची भेट घेतली. यादरम्यान इमॅन्युएल पासपोर्ट आणि व्हिसाचे काम पूर्ण झाल्यावर ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रांची पूर्तता करण्यात येईल असे सांगितले. यादरम्यान नीरजला दुबईत नोकरी लागल्यामुळे तो दुबईत निघून गेला व कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे शान आणि त्याच्या भावाचे थायलंड येथे नोकरीचे काम झाले नाही. दुसरे कोणी तरुण जाण्यास इच्छुक असेल तर सांग असे इमॅन्युएलने शानला सांगितले आणि मी मुंबईत कंपनीचे कार्यालय सुरु करत असून त्या ठिकाणी तुला प्रमुख म्हणून नोकरीला ठेवतो असे त्याने शानला सांगितले. शानने त्याच्या ओळखीचे शबाज खान, याकूब सय्यद आणि साकिब अली सय्यद या तिघांना थायलंडमध्ये नोकरीसाठी विचारले असता त्यांना नोकरीची गरज असल्यामुळे ते तिघे टयूआर झाले व शानने या तिघांची भेट इमॅन्युएलशी घडवून आणली होती.
प्रत्यक्षात अपहरण केले
या तिघांच्या थायलंडच्या नोकरीचे पक्के झाल्यावर हे तिघे ६ सप्टेंबर रोजी थायलंडला रवाना झाले, दुसऱ्या दिवशी शानने या तिघांना संपर्क साधला असता थायलंडच्या हॉटेल पर्यंत सर्व काही इमॅन्युएलच्या सांगण्यापर्यंत घडले, मात्र त्यानंतर त्या तिघांना ९ तास प्रवास करून एका अज्ञात ठिकाणी घेऊन जाण्यात आले व तेथून त्यांना सीमा ओलांडून छुप्या मार्गाने म्यानमारमध्ये आणून त्यांना एका बंकरमध्ये ठेवण्यात आले. त्यांच्यावर शस्त्रधारी इसमाचा पहारा ठेवण्यात आला व त्याचे पासपोर्ट आणि व्हिसा काढून घेण्यात आले असून त्यांना अंदाजे सहा हजार डॉलर जायरो इंटरनॅशनल आय. जी. टी कंपनीची क्रिप्टो करन्सी सेल करावी लागेल त्यामध्ये महिला बोलत आहे असा भास करुन मेसेजिंगच्या द्वारे लोकांना जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करुन सदरची कमाई करायची आहे, जर तुम्ही सहा महिन्यात सहा हजार डॉलर कमवून दिले तरच तुम्हाला थायलंड येथे सोडून तुमचा पासपोर्ट व व्हिसा ताब्यात देण्यात येईल अन्यथा येथेच डांबून ठेवण्यात येईल, असे धमकावण्यात आले असल्याची माहिती थायलन्ड येथे पाठवलेल्या तिघांनी शानला फोनवर दिली व आमची फसवणूक करण्यात आली असल्याचे त्यांनी शान याला सांगितले. शान बादशहा याने तात्कळ वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आहे. या तिघांच्या सुटकेसाठी पोलीस म्यानमार येथील यंत्रणेशी संपर्क साधणार असल्याचे समजते.
Join Our WhatsApp Community