चीनमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. जगासह देशात पुन्हा एकदा कोरोनाची भिती व्यक्त केली जात असताना नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक केले होते. मात्र कोरोनाची तीव्रता कमी झाल्यानंतर कोरोनाचे सर्व निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर बुस्टर डोसकडे पाठ फिरवण्यात आली त्यामुळे अनेक ठिकाणी बुस्टर डोस टाकून देण्याची वेळ आली आहे. त्यानंतर आता कोल्हापूर जिल्ह्यातही तब्बल ३७ हजारांवर डोस कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकून देण्याची वेळ आली आहे. आता नव्याने २० हजार डोसची मागणी आरोग्य विभागाकडून करण्यात आली असून ते नव्या वर्षात उपलब्ध होणार आहेत.
(हेही वाचा – पंतप्रधान मोदींच्या मातोश्रींबद्दल मोठी अपडेट, मेडिकल बुलेटिन जारी करून रूग्णालयाने दिली माहिती
कोल्हापूरमधील आरोग्य विभागाकडे शिल्लक असलेल्या साधारण ३७ हजार बूस्टर डोसची मुदत डिसेंबरमध्ये संपणार आहे. त्यामुळे कोणताही वापर न झाल्याने ते आता वाया जाणार असून कचऱ्यात टाकून द्यावे लागणार आहेत. दोन डोस घेतल्यानंतर सहा महिने झाल्यावर सहा महिन्यांनी बुस्टर डोस देण्यात येत होता. मात्र कोरोना संसर्ग कमी झाल्याने इतर नागरिकांना कोरोना डोस घेतले नाही. दरम्यान, आरोग्य विभागाकडून लोकसंख्येच्या प्रमाणात डोसची मागणी केली होती. परंतु, पाच टक्केच लोकांनी बुस्टर डोस घेतल्याची माहिती आहे. तर शिल्लक असलेल्या बुस्टर डोसची मुदत ३१ डिसेंबर २०२२ रोजी संपणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पसरत होता त्यावेळी जवळपास ९० ते ९५ टक्के, तर ८५ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला. तर तुलनेत बूस्टर डोसला प्रतिसाद मिळाला नाही. केवळ पाच ते सहा टक्के नागरिकांनीच बूस्टर डोस घेतल्याने डोस सर्वाधिक शिल्लक राहिले आहेत. मात्र पुन्हा एकदा कोरोनाची टांगती तलवार असल्याने बूस्टर डोससाठी चौकशी होऊ लागली आहे.
Join Our WhatsApp Community