गुरुवारची संध्याकाळी जळगावातील मुक्ताई तालुक्यातील पंडित धनगरांच्या केळीच्या बागेत चक्क वाघाचे आगमन झाले. या भागांत वाघाचा नवा अधिवास तयार होत आहे. वाघ येथे बछडेही जन्माला घालत आहेत. नजीकच्या कुरा वरोरा भागांत जवळपास ८ ते १० वाघा राहतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून स्थानिक पर्यावरणप्रेमींनी कुरा-वरोरा येथे वाघाचे जंगलक्षेत्र जाहीर करा, ही मागणी पुन्हा उचलून धरली आहे.
अभयारण्य म्हणून त्वरित जाहीर करावे
मुक्ताई तालुक्याला लागून असलेला कुरा वरोरा या भागांतून मुक्ताई येथे अधूनमधून वाघ येतच असतात. मानवी वस्तीतच्या मधोमध वसलेल्या केळीच्या बागेत वाघाला आतापर्यंत माणसांच्या जवळून होणा-या दर्शनाचा फारसा त्रास झालेला नाही. आतापर्यंत वाघाचे या भागांत हल्ल्यांच्या घटनांचीही नोंद कमी आहे. मात्र तरीही मुक्ताई विभागासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षभरापासून नसल्याची खंत चातक या पर्यावरणप्रेमी संस्थेचे अनिल महाजन यांनी केली.
पूर्वीच्या काळात मेळघाटातून येणा-या वाघांनी गुजरातपर्यंत जाण्यासाठी जळगावात भ्रमणमार्ग वापरल्याचे अनिल महाजन सांगतात . मानवी हस्तक्षेपामुळे वाघांचा हा भ्रमणमार्ग कालांतराने बंद झाला. मात्र मेळघाटातील वान-अंबा अभयारण्याच्या नजीकच कुरा वरोरा हा जळगावातील भाग मोडतो. दोन्ही ठिकाणी आता वाघांचे अस्तित्व दिसून येत आहे. वान-अंबा अभयारण्य हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत मोडते. कुरा-वरोरा हा भाग धुळे वनविभाग (प्रादेशिक) अंतर्गत मोडतो. वाघांचा वाढता अधिवास लक्षात घेता कुरा वरोरा येथे वाघांच्या अधिवासाला अभयारण्य म्हणून त्वरित जाहीर करावे, अशी मागणी अनिल महाजन यांनी केली. याबाबत राज्य वन्यजीव बोर्डातही चर्चा झाली. वनाधिका-यांनी जागेला भेटीही दिल्या. पुढील कार्यवाही लवकरात लवकर करावी, अशी मागणी महाजन यांनी केली.
Join Our WhatsApp Communityकेळीच्या बागेत अवतरले वाघोबा… pic.twitter.com/LMpweOOjDZ
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) April 29, 2022