वर्धा जिल्ह्यातील कांरजा तालुक्यात कन्नमवारग्राम गावात शेतक-यावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात शेतकरी लक्ष्मण उईके (३०) यांचा मृत्यू झाला. यंदाच्या वर्षांत वर्धा जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात माणूस ठार झाल्याची ही पहिलीच घटना आहे. मात्र कन्नमवारग्राम गावात गेल्या चार वर्षांत पहिल्यांदाच वाघाच्या हल्ल्यात माणसाचा मृत्यू झाल्याने घबराहटीचे वातावरण आहे.
काय आहे घटना?
बोर व्याघ्र प्रकल्पापासून २० किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. सकाळी साडेआठच्या सुमारास वाघाचा हल्ला झाल्याचा अंदाज नजीकच्या गावक-यांनी व्यक्त केला. याबाबतची माहिती मिळताच वनविभागा घटनास्थळी साडेदहाच्या सुमारास पोहोचले. लक्ष्मण उईके जनावरासाठी शेतातून कापलेले गवत आणण्यासाठी गेले असता त्यांच्यावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात लक्ष्मण उईके जागीच ठार झाले. खूप वेळ शेतात गेल्यानंतर लक्ष्मण उईके घरी परतले नाहीत म्हणून त्यांची पत्नी त्यांचा शोधत शेतात गेली असता त्यांना लक्ष्णण उईके मृतावस्थेत आढळले.
(हेही वाचा – मध्य रेल्वेच्या प्रवासी गाड्यांमध्ये आता ५ मिनिटांत भरले जाणार पाणी!)
घटनास्थळी कॅमेरा ट्रॅप लावणार
वनविभाग घटनास्थळी कॅमेरा ट्रॅप लावणार असल्याची माहिती वनाधिका-यांनी दिली. या भागांत वाघांचा वावर पावसाळ्या दिसून येतो. मात्र आता वाघाचा हल्ला झाल्याने सावधानता म्हणून हल्लेखोर वाघ शोधण्याचे वनविभागाचे प्रयत्न सुरु राहतील, अशी माहिती वनअधिका-यांनी दिली.
Join Our WhatsApp Community