भंडारा वनविभागात मोडणाऱ्या नाकडोंग्री वनक्षेत्रात वाघनखे, सुळेदात आणि हाडे विक्रीसाठी नेणाऱ्या दोन शिकाऱ्यांना वनाधिकाऱ्यांनी सापळा रचून पकडले. गोबरवाही येथे दुचाकीवरून वाघाचे अवयव विक्रीसाठी नेणाऱ्या दोन शिकाऱ्यांना वनाधिकाऱ्यांच्या टीमने शनिवारी, 19 नोव्हेंबर रोजी पकडले.
बनावट ग्राहक बनून शिकाऱ्यांच्या संपर्कात आले
वाघाच्या अवयवाची तस्करी होत असल्याची टीप वनाधिकाऱ्यांना मिळाली होती. वाघाच्या अवयवांची विक्री करण्यासाठी वनाधिकारीच बनावट ग्राहक बनून शिकाऱ्यांच्या संपर्कात आले. दोन दिवस शिकाऱ्यांसोबत बनावट ग्राहक बनलेल्या वनाधिकाऱ्यांची चर्चा सुरु होती. अखेर शनिवारी व्यवहाराचा निर्णय झाला. दुचाकीवरून आलेल्या दोन शिकाऱ्यांनी वाघाचे अवयव दाखवताच वनाधिकाऱ्यांनी दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 15 वाघ नखे, 3 सुळे दात, 10 दातांच्या जोडी, हाडे असा तब्बल पाच किलोचा माल त्यांनी ताब्यात घेतला. संजय श्रीराम पुस्तोडे (44), रामू जयदेव ऊईके (33) अशी या दोन शिकाऱ्यांची नावे आहेत. दोघांवरही वनगुन्हा नोंदवला असून, पुढील कार्यवाही सुरु असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली.
Join Our WhatsApp Community