नागपूरातील पेंच टायगर व्याघ्र प्रकल्पात शुक्रवारी संध्याकाळी वाघाच्या बछड्याचा मृतदेह आढळला. हा बछडा आठ ते नऊ महिन्यांचा असेल असा अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. वनाधिकाऱ्यांना सायंकाळच्या टेहाळणीदरम्यान वाघाच्या बछड्याचा मृतदेह आढळला.
शिकारीची घटना नाही
पेंच व्याघ्र प्रकल्पातील चोरबाहुली या अतिसंरक्षित भागांत वाघाच्या बछड्याचा मृतदेह आढळला. मृतावस्थेत आढळलेला बछडा ‘टी-६६’ या वाघीणीचा असल्याचा वनाधिकाऱ्यांचा अंदाज आहे. ही वाघीण नजीकच्या भागांतच सायंकाळी आपल्या दुसऱ्या बछड्यासह फिरत होती. बछड्याच्या शरीरीवरील सर्व अवयव आढळून आल्याने ही शिकारीची घटना नसल्याची खातरजमा वनाधिकाऱ्यांनी केली. मृत बछड्याचे शनिवारी सकाळी शवविच्छेदन केले जाईल.
Join Our WhatsApp Community