चंद्रपूरात वाघाच्या हल्ल्यात तरूणाचा मृत्यू

चंद्रपूर येथील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील मूल या बफर क्षेत्रात गुरांना गवत चारण्यासाठी जंगलात घेऊन गेलेल्या तरुणाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. गेल्या तीन महिन्यात वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी झालेल्या तीन घटना घडल्याने स्थानिकांमध्ये संतप्त भावना आहे.

चंद्रपूरात वाघाच्या हल्ल्यात तरूणाचा मृत्यू

प्रमोद मोहुर्ले (३२) असे वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्याचे नाव आहे. भादुर्णी येथील पडझडीत सकाळी सात वाजता प्रमोद आपल्या गुरे चारायला जंगलात घेऊन गेले. सकाळी जंगलातच गुरे चारण्यासाठी गेले असता वाघाने त्याच्यावर हल्ला केला. वाघाने प्रमोदला फरफडत नेताना त्याच्या किंचाळण्याचा आवाज शेजारच्या गुराख्याने ऐकला. त्याने धावत जाऊन गावात ही घटना सांगितली. वनाधिकारी व गावक-यांनी बराच काळ शोध घेतल्यानंतर दुपारी प्रमोदचा मृतदेह छिन्नाविछिन्न अवस्थेत आढळला. प्रमोद यांचा मृतदेह मूल जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

( हेही वाचा : 7th Pay Commission : वेतन आयोग बंद होणार? सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी सरकारचा नवा फॉर्म्युला)

सततच्या लागोपाठ घटनांमुळे वाघांच्या बंदोबस्ताची मागणी करा, अशी मागणी आता गावकरी करत आहे. वाघाचे वास्तव्य असलेल्या भागांत सकाळी तसेच सायंकाळी जंगलात जाऊ नका, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here